योग दिनानिमित्त मालेगाव शहरात मोटारसायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 02:19 PM2018-06-20T14:19:20+5:302018-06-20T14:22:37+5:30

मालेगव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जनजागृतीचा एक भाग म्हणून पतंजली योग समितीच्यावतीने मालेगाव शहरात २० जून रोजी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

Motorcycles rally in Malegaon on the occasion of Yoga Day | योग दिनानिमित्त मालेगाव शहरात मोटारसायकल रॅली

योग दिनानिमित्त मालेगाव शहरात मोटारसायकल रॅली

googlenewsNext
ठळक मुद्देयोगदिनाला उपस्थित राहण्याचा संदेश देण्यासाठी सदर रॅली काढण्यात आली.‘करो योग-रहो निरोग’, भारत माता की जय, जय जवान-जय किसान, वंदे मातरम अशा घोषणा रॅलीमध्ये देण्यात आल्या. गांधी चौक मार्गे मुख्य बाजारपेठमधून सदर रॅलीचा समारोप मातोश्री कॉम्प्लेस येथे करण्यात आला.

मालेगव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जनजागृतीचा एक भाग म्हणून पतंजली योग समितीच्यावतीने मालेगाव शहरात २० जून रोजी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. २१ जून रोजी सकाळी ५.३० वाजता स्थानिक ना.ना. मुंदडा महाविद्यालयांमध्ये भव्य योगा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 
योगदिनाला उपस्थित राहण्याचा संदेश देण्यासाठी सदर रॅली काढण्यात आली. ‘करो योग-रहो निरोग’, भारत माता की जय, जय जवान-जय किसान, वंदे मातरम अशा घोषणा रॅलीमध्ये देण्यात आल्या. गोपाल पाटील राऊत यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यावरून पंचायत समिती मार्गे तहसील कार्यालय, गांधी चौक मार्गे मुख्य बाजारपेठमधून सदर रॅलीचा समारोप मातोश्री कॉम्प्लेस येथे करण्यात आला. रॅलीमध्ये बहुसंख्य योग समिती पदाधिकाºयांची उपस्थिती होती. सर्व योग समितीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मालेगाव शहरातील योग शिबिर हे भव्यदिव्य करण्याचे ठरविले असून त्यामध्ये मालेगाव शहरासह तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, किसान पंचायत, महिला पतंजली, युवा भारत समिती मालेगावच्या वतीने करण्यात आलेले आहे.
या रॅलीमध्ये प्रदेश सदस्य गोपाल पाटील राऊत, विस्तारक रमेश आप्पा खोबरे, जिल्हा सरचिटणीस नितीन काळे, पंचायत समिती सदस्य संजय देशमुख, शहराध्यक्ष तेजस आरू, सुनील काटेकर, हरी लहाने,  पंकज पाध्ये, नामदेव बोरचाटे, मालेगाव तालुका प्रभारी यशवंत जावळे, वसीम पठान, विजय भूरकाडे,  अनिल सोळंके, गणेश कुटे, किरण जिरवणकर,  संतोष तीखे, मधुकर भांडेकर, विनोद कल्याणकर, ज्ञानेश्वर देवळे,  जगदीश देशमुख, अनिल निंबूकार, दर्शन दहात्रे काना दहात्रे, नीलेश वाघमारे, सुधीर डेवसन यांच्यासह पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. रॅलीचा समारोप गोपाल पाटील राऊत यांच्या जनसंपर्क कार्यालयांमध्ये आभार व्यक्त करून करण्यात आला.
२१ जून रोजी स्थानिक ना.ना. मुंदडा विद्याालय येथे सकाळी ५.३० वाजता भव्य योग शिबिर घेण्यात येणार आहे . तेथे  प्रशिक्षित शिक्षक योग करुण घेणार आहेत. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.

Web Title: Motorcycles rally in Malegaon on the occasion of Yoga Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.