- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना फायटर्स म्हणून अत्यावश्यक सेवा देणाºया सफाई कामगारांचा जीवन विमा राज्य शासनाने उतरविला नाही. त्यामुळे राज्यातील सर्वच पालिका कर्मचारी संतप्त झाले असून राज्य शासनाच्या निषेधार्थ पालिका कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. उद्या सोमवार २७ एप्रिलपासून सफाई कामगारांसह राज्यातील ३६३ शहरातील पालिका कर्मचारी टप्प्या-टप्प्याने आंदोलन छेडणार आहेत.कोरोना या विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आपातकालीन परिस्थितीत राज्यातील सर्वच नगर पालिकेतील विविध संवर्गातील अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता सेवारत आहे. कोरोना फायटर्स म्हणून सेवारत असलेल्या पालिका कर्मचाºयांना राज्य शासनाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याच्या निषेधार्थ, कामगार संघटना एकवटल्या आहेत. त्यामुळे सोमवारपासून पालिका कर्मचाºयांच्या जीवन विमा काढण्याच्या आंदोलनाला धार चढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
जीवन विमा काढण्यास टाळाटाळ! कोरोना या विषाणू संसर्ग महामारीच्या अनुषंगाने ग्रामविकास, गृहविभाग आणि आरोग्य विभागातील कर्मचाºयांचा वैद्यकीय विमा यापूर्वीच उतरविला आहे. मात्र, गत महिनाभरापासून सफाई कामगाराचा जीवन विमा काढण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. आरोग्य विभागाच्या डॉक्टर व इतर कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचाºयांप्रमाणे सफाई कामगार आणि इतर पालिका कर्मचाºयांचा विमा उरविण्याची कर्मचारी संघटनांची मागणी आहे. मात्र, गत महिनाभरापासून पालिका कर्मचाºयांचा जीवन विमा काढण्यास शासनाकडून टाळाटाळ केली जात आहे.
सफाई कामगार संघटनांचा पाठींबा!पालिका कर्मचाºयांचा जीवन विमा उतरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संघटनेने छेडलेल्या आंदोलनाला राज्यातील अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आणि अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे. यासंदर्भात संबंधित सफाई कामगार संघटनांनी पत्रही दिले आहे.
राज्य शासनाने आरोग्य, ग्रामविकास आणि पोलिस कर्मचाºयांचा विमा उरविला आहे. मात्र, पालिका कर्मचाºयांना वगळण्यात आले आहे. पालिका कर्मचाºयांचा विमा काढण्यासाठी गत महिनाभरापासून लढा देत आहोत. मात्र, शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने उद्यापासून टप्प्या टप्प्याने आंदोलन छेडण्यात येत आहे.- विश्वनाथ घुगेराज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संघटना, महाराष्ट्र