धाड : बुलडाणा तालुक्यातील मढ येथे एकाचा पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. धाड पोलिस स्टेशनअंतर्गंत येणाऱ्या मढ येथील विजय पुनीलाल चांदा हे १३ जानेवारी रोजी बेपत्ता झाले होते. मात्र नातेवाईकसांनी १४ जानेवारी रोजी शोध घेऊनही ते सपडले नाहीत. दरम्यान, विजय चांदा यांचा भाऊ राजू पुनीलाल चांदा यांनी १५ जानेवारी रोजी ते बेपत्ता झाल्याची तक्रार धा पोलिस ठाण्यात दिली होती. बेपत्ता व्यक्तीच्या कुटुंबियांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. दरम्यान मढ येथील पैनगंगा नदीच्या पुलाजवळच्या रस्त्यावर संशयास्पदस्थितीत रक्ताचे डाग दिसल्यामुळे बेपत्ता इसमाच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. यावरून पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले असता श्वानने रक्ताचे डाग असलेल्या रस्त्यावर १ कि़मी. अंतरावरील चिचतळ््यानजीक एका खड्ड्याजवळ पोलिसांना नेऊन पोहोचवले. त्या खड्डयात बेपत्ता असलेल्या विजय चांदा याचा खून करून त्यांना त्यांचे पार्थिव गाडण्यात आल्याचे दिसून आले. यावेळी पंचनामा करून मृतक विजय चांदाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलडाणा येथील सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून विजय चांदा यांचा पूर्ववैमनस्यातून ईश्वर रामचंद्र बालोद, त्याची तिन मुले दीवान बालोद, महिपाल बालोद, गोपाल बालोद आणि विजय नारायण बालोद यांनी खून केल्याची खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली धाडचे ठाणेदार संग्राम पाटील करीत आहेत.
बुलडाणा -मराठवाड्याच्या सीमेलगत मढ येथे पूर्ववैमनस्यातून एकाचा खून; पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 4:58 PM
धाड : बुलडाणा तालुक्यातील मढ येथे एकाचा पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
ठळक मुद्देधाड पोलिस स्टेशनअंतर्गंत येणाऱ्या मढ येथील विजय पुनीलाल चांदा हे १३ जानेवारी रोजी बेपत्ता झाले होते. विजय चांदा यांचा भाऊ राजू पुनीलाल चांदा यांनी १५ जानेवारी रोजी ते बेपत्ता झाल्याची तक्रार धा पोलिस ठाण्यात दिली होती. पैनगंगा नदीच्या पुलाजवळच्या रस्त्यावर संशयास्पदस्थितीत रक्ताचे डाग दिसल्यामुळे बेपत्ता इसमाच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.