- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ताप, शरीरातील आॅक्सीजनची पातळी कमी असणे आणि दुर्धर आजार या तीन पैकी प्रत्येकी दोन लक्षणे आढळून आलेल्या जिल्ह्यातील ४३० संदिग्धांना कोरोना होण्याचा धोका पाहता त्वरित फिव्हर क्लिनीक मध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या व्यापक मोहिमेतंर्गत सध्या घरोघरी सुरू असलेल्या व्यापक सर्वेक्षण व तपासणी मोहिमेअंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील २६ लाख ६० हजार नागरिकांची प्रत्यक्ष गृहभेटी देवून कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी सध्या सर्वेक्षण मोहिम सुरू आहे. त्यातंर्गत जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात ही मोहिम राबविण्यात येत असून त्यातंर्गत तपासणीत उपरोक्त व्यक्तींमध्ये तीन पैकी दोन लक्षणे आढळून आल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. परिणामी कोरोनाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने गेल्या पाच दिवसातील मोहिमेला बऱ्यापैकी यश आल्याचे चित्र आहे. यासाठी जिल्ह्यात १,७१८ पथके नियुक्त करण्यात आलेली असून ५,१५४ व्यक्ती या पथकामध्ये कार्यरत आहे. गेल्या पाच दिवसात जवळपास जिल्ह्यातील ४० टक्के घरांना या पथकांनी भेटी दिल्या आहे. जिल्ह्यातील एकूण ५ लाख ६९ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण या मोहिमेत करण्यात येत आहे. दोन टप्प्यात ही मोहिम राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबर ते दहा आॅक्टोबर सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येतेय.
चिखली तालुक्यात सर्वाधिक दुर्धर आजाराचे रुग्णचिखली तालुक्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासणीत ३,७९१ दुर्धर आजार असणाºया व्यक्ती आढळून आल्या आहेत. तर मेहकरमध्ये ३,३३६, लोणारमध्ये २,७२८, देऊळगाव राजात २,४०८, बुलडाण्यात १,८५२, जळगाव जामोदमध्ये १,५६०, खामगावात १,३३४, मलकापूरमध्ये ९९०, मोताळ््यात १,९५३, नांदुºयामध्ये १,९८१, संग्रामपूरमध्ये २७६, शेगावमध्ये ४३६ तर सिंदखेड राजा तालुक्यात १,९२७ व्यक्ती आतापर्यंत दुर्धर आजार असलेल्या आढळून आल्या आहेत.
घरातील प्रत्येकाची तपासणीघरपरत्वे ही पथके जात असून घरातील प्रत्येकाची विचारपूस करण्यासोबतच आॅक्सीमीटरवर प्रत्येकाच्या शरीरातील आॅक्सीजन पातळी मोजणे, शरीराचे तापमान आणि दुर्धर आजारांची माहिती सर्वेक्षण करणाऱ्यांकडून घेतल्या जात आहे. सोबतच यात कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींना थेट लगतच्या फिव्हर क्लिनीकमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात येत आहे. दोन ते तीन फिव्हर क्लिनीक मिळून एक रुग्ण वाहिकाही त्यासाठी तैनात करण्यात आलेली आहे.
लोणारातील ७४ जणांचा दुर्धर आजारबुलडाणा जिल्ह्यात दुर्धर आजार, ताप आणि आॅक्सीजन पातळी कमी असणाºया ४३० जणांना आतापर्यंत रुग्णालयात हलविण्यात आले असून एकट्या लोणार तालुक्यातील ७४ तर बुलडाणा तालुक्यातील ७१ जणांचा यात समावेश आहे. चिखली तालुक्यातील ५४, देऊळगाव राजातील २९, खामगावमधील ५३, मलकापूरमधील १५, मेहकरमधील १९, मोताळ््यातील सहा, नांदुºयातील ४९, संग्रामपूरमधील २०, शेगावमधील १२ आणि सिंदखेड राजा तालुक्यातील २८ जणांचा समावेश आहे.