नांदुरा येथे मुख्यमंत्र्यांना विरोध करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 01:21 PM2017-12-17T13:21:29+5:302017-12-17T13:21:59+5:30
नांदुरा येथील सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आगमन होण्यापूर्वी च रविवारी 17 डिसेंबर रोजी पोलिसानी त्यांना अटक केली. जिगाव प्रकल्पासह 8 लघु प्रकल्पाच्या कामाचे कार्यान्वितीकरण आज होत आहे.
बुलडाणा - नांदुरा येथील सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आगमन होण्यापूर्वी च रविवारी 17 डिसेंबर रोजी पोलिसानी त्यांना अटक केली. जिगाव प्रकल्पासह 8 लघु प्रकल्पाच्या कामाचे कार्यान्वितीकरण आज होत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत जनतेत रोष होता. नेत्यांना काळे झेंडे दाखविण्यापूर्वीच सभेच्या आधी काँग्रेसच्या व मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक केली. यामध्ये कॉंग्रेस तालुकाध्यक्ष भगवान् धांडे, मोहतेशाम रजा शहर अध्यक्ष, नीलेश पाउलझगडे, राजेश पोलाखरे कॉंग्रेस, श्रीकृष्ण सपकाळ मनसे, गणेश धामोड़कर मनसे, निलेश डवले नगर विकास आघाडी यांच्यासह 50 ते 60 कार्यकर्त्याचा समावेश होता. खामगाव शहर पो.स्टे.येथे नेण्यात आले.