नांदुरा (बुलडाणा) : मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वीच सभेत गोंधळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:50 AM2017-12-18T01:50:41+5:302017-12-18T01:51:29+5:30
नांदुरा (बुलडाणा) : वेगळा विदर्भ व सिंदखेड राजा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्ध करुन द्या, अशा घोषणा देत काही युवकांनी मु ख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी सभास्थळी गोंधळ घातला. यावेळी निदर्शकांनी काळे झेंडे दाखवले. तर काही जणांनी खुच्र्याची फेकाफेकही केली.
लोकमत न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणासाठी उभे राहताच काही युवकांनी हातातील काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली. कार्यक्रमस्थळी बैठक व्यवस्था अपुरी पडल्याने खुर्चीवर बसलेल्या काही लोकांना ऐन वेळेवर उठावे लागले. त्यामुळे या लोकांनी खुच्र्या फेकाफेक केल्याचा प्रकारही घडला. यावेळी पोलीस व भाजप कार्यकर्त्यांनी नागरिकांना शांत केले व त्यांची बसण्याची व्यवस्था केली. जिल्ह्यात दारूबंदी करावी या मागणीसाठी प्रेमलता सोनुने यांनी शिवाजी पुतळ्य़ानजीक आंदोलन केले. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले.
काँग्रेस, मनसे कार्यकर्ते स्थानबद्ध!
राज्यातील शेतकर्यांच्या प्रश्नांवर शासन गंभीर नाही, पूनर्वसनाचा प्रश्न गंभीर आहे आदी मुद्दे घेऊन आंदोलनाच्या तयारीत असलेल्या काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आंदोलनापूर्वीच स्थानबद्ध केले.