निपाणा गाव तस चांगल, पण प्रभाराने वेढलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:38 AM2021-09-27T04:38:02+5:302021-09-27T04:38:02+5:30

पोलीस पाटील पदाचा प्रभार मलकापूर तालुक्यातील दुधलगाव बु. येथील पोलीस पाटील गजानन झनके यांचेकडे आहे. तर आरोग्य सेवक पदाचा ...

Nipana village is good, but surrounded by charge | निपाणा गाव तस चांगल, पण प्रभाराने वेढलं

निपाणा गाव तस चांगल, पण प्रभाराने वेढलं

googlenewsNext

पोलीस पाटील पदाचा प्रभार मलकापूर तालुक्यातील दुधलगाव बु. येथील पोलीस पाटील गजानन झनके यांचेकडे आहे. तर आरोग्य सेवक पदाचा पदभार शेलगाव बाजार येथील आरोग्य सेवक रामेश्वर घोडके यांना दिलेला आहे. तसेच आरोग्य सेविका जुन्गडे यांची नियुक्ती आव्हा उपकेंद्रात होती. परंतु त्यांची प्रतिनियुक्ती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात केलेली आहे. त्यांचा पदभार अंजली पारवेकर या सांभाळत आहेत. या आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे निपाणा येथील महिला व बालकांना आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामसेवक यांचे मुख्यालय तळणी ग्रामपंचायत असून, तळणी ग्रामपंचायत अंतर्गत आधींच पिंपळपाटी तळणी याा दोन गावांचा कारभार ग्रामसेवकांना सांभाळावा लागतो. त्यात अतिरिक्त ग्रामपंचायत निपाणा असल्याने गावास पुरेसा वेळ त्यांना देता येत नाही. ज्यामुळे ग्रामपंचायती अंतर्गत होणारी विकास कामे कासवगतीने होत आहेत. तलाठी एस. बी. जाधव यांची बदली झाल्याने त्यांचा साजाचा अतिरिक्त पदभार सतीश मुळे यांना देण्यात आलेला आहे. निपाण्यातील महावितरणच्या अभियंता तेजस्विनी साजनीकर यांची कोल्हापूर येथे बदली झाली असून, त्यांचा पदभार शेलगाव बाजार येथील कनिष्ट अभियंता वैभव चव्हाण यांचेकडे आहे. ज्यामुळे गावाचा विकास कसा करावा असा प्रश्न सरपंच शारदा संतोष तांदूळकर या प्रशासनास विचारत आहेत.

Web Title: Nipana village is good, but surrounded by charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.