- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हा परिषद शाळा तथा क्रीडा मंडळे आणि व्यायाम शाळांना वाटप करण्यात आलेल्या अनुदानाच्या अनुषंगाने तपासणी मोहिम सुरू करण्यात आली असून सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात काही ठिकाणी ती सुरू झाली आहे. दरम्यान, प्रकरणी ६० संस्थांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालायने नोटीस ही बजावल्या आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. व्यायाम शाळा विकास अनुदानासह अन्य काही योजनातून स्वयंसेवी संस्था, क्रीडा मंडळे व तत्सम संस्थांना क्रीडा विकासाच्या दृष्टीकोणातून वर्तमान काळात व्यायाम शाळा बांधकामासाठी सात लाख रुपये व ते झाल्यानंतर साहित्यासाठी सात लाख रुपये असे सुमारे १४ लाख रुपयांचे अनुदान दिल्या जाते. यातील २५ टक्के हिसा हा संबंधित संस्थेला द्यावा लागतो. त्यादृष्टीने बुलडाणा जिल्ह्यात २०१६ पासून आजपर्यंत काही संस्थांना निधी अर्थात अनुदान देण्यात आले होते.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनुषंगीक विषयान्वये जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींना देण्यात आलेला नाही ग्रामसेवक व सरपंच यांनी कुठलेही काम न करता परस्पर निधी काढून घेता, असा मुद्दा काही लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला होता. ११ जुलै २०१९ च्या बैठकीतही तत्कालीन आमदार असलेले डॉ. शशिकांत खेडेकर आणि हर्षवर्धन सपकाळ यांनीही मुद्दा उपस्थित केला होता.प्रकरणी उपरोक्त कालावधीत ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद शाळाना व्यायाम शाळा बांधकाम, साहित्या करीता वितरीत करण्यात आलेल्या अनुदानीत संसथांची यादी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आली होती.सोबतच संबंधित संस्थांनी काम पूर्णत्वाचा दाखला, कामाचे फोटो, अनुदान विनीयोग प्रमाणपत्र सादर करण्याबाबत संबंधित संस्थांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. दुसरीकडे जिल्ह्यात गेल्या २० वर्षात झालेल्या अनुदान वाटपाचीही तपासणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत असून पूर्वी व्यायामशाळा विकासाठी एक लाख रुपये, त्यानंतर दोन लाख रुपये व त्यांनी ते सात लाख रुपये करण्यात आले होते. तपासणी मोहिमेमुळे क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
माहिती आयुक्त गठीत करणार पथकमाहिती आयुक्ताकडून या प्रकरणामध्ये एक पथक गठीत करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात २०१६-१७ ते २०१८-१९ या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कार्यालय तसेच जिल्हा परिषद शाळांना व्यायाम शाळा बांधकाम, व्यायाम शाळा साहित्य याकरीता अनुदान वितरीत करण्यात आले होते. त्याच्या संदर्भाने तपासणीसाठी एक पथक गठीत होण्याची शक्यता असून सध्या जिल्ह्यातील काही तालुक्याती संस्थांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती आहे.