लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : दसरा व दिवाळीदरम्यान मिठाईची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येते. आता ग्राहकांना ती मिठाई केव्हापर्यंत खाता येईल यासंबधी सूचना देणारी तारीख म्हणजेच 'बेस्ट बिफोर' ही मिठाईच्या ट्रेसमोर लिहीणे बंधनकारक करण्यात आले आहे.या नियमाची अमंलबजावणी १ आॅक्टोंबरपासुन न केल्यास दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. हॉटेल, मिस्ठान्न भांडार व विविध दुकानांवर मिठाई व दुग्धजन्य पदार्थ विक्री केले जातात. परंतु त्या मिठाई किंवा दुग्धजन्य पदाथार्चा वापर केव्हापर्यंत करायचा यासंदर्भात त्या मिठाई किंवा दुग्धजन्य पदांवर लिहीलेले नसते. परिणामी हलकी बुरशी चढलेले पदार्थही ग्राहकांच्या माथी मारले जाते. घरी नेल्यावर रात्रभरातच ते साहित्य खराब होतात. ते पदार्थ सेवन केले की अनेकांची प्रकृती खालावले.अन्नातून विषबाधा होते. अशी अनेक उदाहरणे समोर येतात. परंतु या प्रकारासंदर्भात एखाद्या ग्राहकाने दुकानदाराला म्हटल्यावर ते आपला हात झटकतात. हे होऊ नये यासाठी आता प्रत्येक मिठाई व दुग्धजन्य पदार्थाच्या ट्रे समोर बेस्ट बिफोर लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे.सर्व मिठाई उत्पादक विक्रेत्यांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. बर्फी, मिठाई व दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीसाठी साठविलेल्या ट्रेववर 'बेस्ट बिफोर' ठळक अक्षरात लिहिणे १ आॅक्टोंबरपासून बंधनकारक करण्यात आले आहे.मिठाई किती दिवस खाण्यायोग्य याची मिळेल माहिती•अन्न सुरक्षा व मानद प्राधिकारी नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.याची अंमलबजावणी १ आॅक्टोबर २०२० पासून महाराष्ट्र राज्यात अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. प्रत्येक खुल्या मिठाईच्या ट्रेवर बेस्ट बिफोर दिनांक टाकल्याने ग्राहकांना ती मिठाई किती दिवसपर्यंत खाणे योग्य राहते याची कल्पना येईल. त्यामुळे अन्न विषबाधा सारख्या अप्रिय घटना टाळता येऊ शकतील.
आता प्रत्येक मिठाई ट्रे समोर असेल 'बेस्ट बिफोर'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 12:54 PM
Sweet Mart 'बेस्ट बिफोर' ही मिठाईच्या ट्रेसमोर लिहीणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे मिठाई किती दिवसपर्यंत खाणे योग्य राहते याची कल्पना येईल. १ आॅक्टोंबरपासून बंधनकारक करण्यात आले आहे.