बुलडाणा : मतदानापासून कोणीही वंचीत राहू नये, म्हणून मतदानाच्यावेळी मतदारांच्या हाताच्या बोटावर शाई लावली जाते. असाच उपक्रम आता पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेतही अवलंबण्यात येत आहे. ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलीओ डोस पाजण्यात यावा, यासाठी लसीकरण झालेल्या सर्व बालकांच्या डाव्या करंगळीवर मार्कर पेनने खुण करण्यात येणार आहे. पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेची जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात पल्स पोलीओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत ११ मार्च रोजी जिल्ह्यात पल्स पोलीओ लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यात ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना या दिवशी पोलीओ डोस पाजण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यात पोलीओ बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मोबाईल टिम, रात्रीच्या टिम सज्ज करण्यात आल्या आहे. या जिल्ह्यातील सर्व गावे, वाड्या, वस्ती, तांडे, विटभट्टी, मेंढपाळ, आदिवासी कुठल्याही स्तरावरील बालक वंचित राहणार नसल्याची काळजी घेण्यात येत आहे. लसीकरण झालेल्या सर्व बालकांच्या डाव्या करंगळीवर मार्कर पेनने खुण करण्यात येणार असून यासाठी मोबाईल पथक, ट्रन्झिट टीम आदी सज्ज ठेवण्यात येत आहे. जेणेकरून कुणीही बालक पोलीओ डोसपासून वंचित राहणार नाही. तरी जनतेने लाभ घेत आपल्या ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलीओचा डोज पाजावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
मतदानाप्रमाणे आता पोलीओ लसीकरण झालेल्या बालकांच्या डाव्या करंगळीवर खुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 2:08 PM
बुलडाणा : मतदानापासून कोणीही वंचीत राहू नये, म्हणून मतदानाच्यावेळी मतदारांच्या हाताच्या बोटावर शाई लावली जाते. असाच उपक्रम आता पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेतही अवलंबण्यात येत आहे.
ठळक मुद्दे ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलीओ डोस पाजण्यात यावा, यासाठी लसीकरण झालेल्या सर्व बालकांच्या डाव्या करंगळीवर मार्कर पेनने खुण करण्यात येणार आहे.पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेची जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत ११ मार्च रोजी जिल्ह्यात पल्स पोलीओ लसीकरण करण्यात येणार आहे.