ओबीसी आरक्षण बचाओ समितीचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 02:34 PM2019-07-24T14:34:46+5:302019-07-24T14:34:56+5:30
महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण बचाव समिती च्या वतीने स्थानिक उपविभागीय कार्यालयावर शांततापूर्वक मूक मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद: खाजगी विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये संवैधानिक आरक्षण ओबीसी विद्यार्थ्यांकरीता १००% लागू करण्यात यावे आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शंभर टक्के फी भरण्याची व्यवस्था शासनाने करावे तसेच इतर मागास वर्गीय प्रवगार्ची नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी आज दिनांक २३ जुलै रोजी दुपारी चार वाजता महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण बचाव समिती च्या वतीने स्थानिक उपविभागीय कार्यालयावर शांततापूर्वक मूक मोर्चा काढण्यात आला आणि उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.
खाजगी विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या सवर्ण संवगार्ला आणि सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या मराठा संवगार्ला हे आरक्षण १००% लागू करण्यात आले आहे. सर्वांना समान न्याय या तत्वानुसार सदर संवैधानिक आरक्षण ओबीसी प्रवगार्ला ही शंभर टक्के लागू करण्यात यावे जे केवळ पन्नास टक्के एवढेच मिळत आहे तसेच इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातील शैक्षणिक शुल्क ३० ते ४० टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी प्रवगार्तील विद्यार्थी सदरचे शुल्क भरण्यास आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत त्यामुळे इतर प्रवर्गा प्रमाणे ओबीसी प्रवगार्तील विद्यार्थ्यांची खाजगी विना अनुदानित महाविद्यालयातील शैक्षणिक शुल्काची १००% परिपूर्ती ही शासनाने करावी तर ओबीसी करिता नॉन क्रिमिलेअरची मयार्दा आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची आहे. त्यामुळे शासकीय आणि खाजगी अनुदानित वैद्यकीय महा विद्यालयात फी मध्ये ५० टक्के सवलत मिळत नाही करिता सर्व उन्नत गटातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
सध्या वैद्यकीय महाविद्यालय विद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे ओबीसींचे वरील सर्व प्रश्न त्वरित सोडविण्यात यावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनातून ओबीसी आरक्षण बचाव समितीने दिला आहे.
स्थानिक दुर्गा चौका मधून दुपारी चार वाजता ओबीसींच्या मूक मोचार्ला सुरुवात झाली अतिशय शांततेत महिला विद्यार्थी आणि ओबीसी घटकातील सर्वांचा यामध्ये समावेश होता सरळ उपविभागीय कार्यालयावर मोर्चा धडकला त्यानंतर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत नायब तहसीलदार खाडे यांनी निवेदन स्वीकारले.
(प्रतिनिधी)