लॅपटॉप अपहारप्रकरणी संग्रामपूर तहसीलच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 06:40 PM2019-06-09T18:40:46+5:302019-06-09T18:40:50+5:30

संग्रामपुर : संग्रामपूर तहसीलमधील तीन लॅपटॉप अपहार प्रकरणी चौघांवर तामगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Offence filed against Sangrampur Tehsil four employees | लॅपटॉप अपहारप्रकरणी संग्रामपूर तहसीलच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

लॅपटॉप अपहारप्रकरणी संग्रामपूर तहसीलच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Next

संग्रामपुर : संग्रामपूर तहसीलमधील तीन लॅपटॉप अपहार प्रकरणी चौघांवर तामगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
संग्रामपूर तहसीलला १० लॅपटॉप व १६ प्रिंटर प्राप्त झाले होते. तहसीलदार महेश पवार यांनी तहसील मधील कर्मचारी बग्गन, कांबळे, ठोंबरे व एक खाजगी वाहन चालक या चौघांना बुलढाणा येथे तहसीलला लॅपटॉप व प्रिंटर आणण्याकरिता ७ जूनरोजी पाठवले. 
बुलढाणा वरून कर्मचाºयांनी १० लॅपटॉप १६ प्रिंटर घेतले. परंतु तहसील ला १६ प्रिंटर व सातच लॅपटॉप जमा केले. प्राप्त दहापैकी सात लॅपटॉप जमा करण्याप्रकरणी तहसीलदारांनी चौघांना विचारपूस केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही.  या प्रकरणी संग्रामपूर तहसीलचे नायब तहसीलदार डी.व्ही. मानकर यांनी शनिवारी रात्री उशिरा तामगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून संग्रामपूर तहसीलचे तीन कर्मचारी बग्गन, कांबळे, ठोंबरे व एक खासगी वाहन चालक असे चौघांवर शासकीय मालमत्तेचा अपहार केल्याप्रकरणी कलम ४०६, ४०९, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तामगाव पोलिस स्टेशनचे पी.एस.आय आर.बी.बावनकर करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Offence filed against Sangrampur Tehsil four employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.