शहीद दिनानिमित्त रक्तदान महाशिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:30 AM2021-03-15T04:30:51+5:302021-03-15T04:30:51+5:30
राष्ट्रीय एकात्मता मंच, निफा संघटना, निमा संघटना, ब्रह्मकुमारी संस्थान, राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, इंडियन रेडक्राॅस सोसायटी, आयएमए, होमिओपॅथीक, आझाद ...
राष्ट्रीय एकात्मता मंच, निफा संघटना, निमा संघटना, ब्रह्मकुमारी संस्थान, राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, इंडियन रेडक्राॅस सोसायटी, आयएमए, होमिओपॅथीक, आझाद हिंद, शिक्षक संघटनेच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती निमा संघटनेचे राज्य मार्गदर्शक डॉ. गजानन पडघान यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. येथील सुश्रृत आयुर्वेद रूग्णालयात शहीद दिनानिमित्त महारक्तदान शिबिराची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिनेश अग्रवाल, सचिव डॉ. प्रवीण पिंपरकर, डॉ. अजय खर्चे, समन्वयक डॉ. प्रशांत ढोरे, डॉ. रवींद्र वाघमारे, डॉ. देवकर, वुमन फोरमच्या डॉ. वैशाली पडघान, होमिओपॅथीक संघटनेचे डॉ. दुर्गासिंह जाधव, दंत चिकित्सक डॉ. आशिष खासबागे, शिक्षक संघटनेचे राजपूत प्रामुख्याने उपस्थित होते. बुलडाणा येथे सुश्रृत हॉस्पिटलमध्ये महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला आयएमए संघटना जे. बी. राजपूत, होमिओपॅथीक डॉ. दुर्गासिंग जाधव, आझाद हिंद संघटना अॅड. सतीष रोठे, शिक्षक संघटना राजपूत, अंजली परांजपे यासह इतर संघटनांनी सुद्धा सक्रिय सहभाग घेऊन महारक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. गजानन पडघान यांनी केले आहे.