पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढला;शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 06:42 PM2020-07-20T18:42:58+5:302020-07-20T18:43:10+5:30
गतवर्षी पेक्षा १७५ कोटी रुपये जादा पीक कर्ज आतापर्यंत वाटप करण्यात आल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचा टक्का गेल्या पाच वर्षातील निच्चांकी पातळीवर असताना तो वाढविण्यासाठी प्रसंगी बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे संकेत पालकमंत्र्यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाची स्थिती पाहली असता गतवर्षी पेक्षा १७५ कोटी रुपये जादा पीक कर्ज आतापर्यंत वाटप करण्यात आल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. त्यामुळे फौजदारी कारवाईची मात्रा सध्या चांगलीच लागू पडत असल्याचे दिसत आहे.
शासनाने कर्जमाफीचा लाभ देउन शेतकºयांना दिलासा दिला. मात्र, अनेक शेतकºयांना कर्ज माफीचा लाभ मिळूनही नविन पीक कर्ज मिळत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे, पालकमंत्री ना.राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठक घेउन ३० जून पर्यंत शेतकºयांना कर्ज वाटप न केल्यास दिरंगाई करणाºया बँकाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पालकमंत्र्यांच्या इशाºयानंतर राष्टीय कृत बँकासह खासगी बँकांनीही कर्ज वाटपाची गती वाढवल्याने बहुतांश शेतकºयांच्या खात्यात पीक कर्जाची रक्कम जमा करण्यात आली आहे. १० जुलै पर्यंत १ लाख ४० हजार २३६ शेतकºयांना ९३४.२९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे, शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी ६२ हजार ५९१ शेतकºयांना ५११ कोटी ३१ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले होते. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात हे कर्ज वाटप करण्यात आले होते. यावर्षी खरीप हंगामात ३ लाख ६२ हजार ८२६ शेतकºयांना कर्ज वाटप करण्याचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले होते. तसेच १ लाख ९३ हजार ९१६ शेतकरी पीक कर्जासाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ८४ हजार १०६ शेतकºयांयना ६७० कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
शेतकरी कर्ज माफीसाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक शेतकºयाना पीक कर्ज देण्यात येणार आहे. त्याविषयी जिल्ह्यातील सर्व बँकांना निर्देश देण्यात आले आहेत. बँकांना दिलेल्या उद्दीष्टानुसार कर्जवाटप सुरू आहे. आतापर्यंत ६२ हजार शेतकºयांना ५११ कोटी ३१ लाख रुपयांचे पीक कर्ज वापट करण्यात आले आहे.
उत्तम मनवर,
व्यवस्थापक, अग्रणी बँक