बुलडाणा: जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतमधील १३८ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी २३ जूनला मतदान होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील जुलै ते सप्टेंबर २०१९ कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला आहे. जिल्ह्यातील खामगांव तालुक्यातील निळेगांव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व चिखली तालुक्यातील अंबाशी ग्रामपंचायातीच्या थेट सरपंच पदासाठी ही निवडणू होणार आहे. तसेच ८८ ग्रामपंचायतीमधील रिक्त असलेल्या १३ तालुक्यातील १३८ सदस्य पदांकरीता पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमानुसार १० जुन रोजी उमेदवारी मागे घेतल्यानंतर जिल्ह्यात २३ जुन रोजी मतदान होणार आहे. मतमोजणीसाठी ठिकाण व वेळेबाबत जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार २४ जुन रोजी सकाळी ९ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणी ठिकाणचे बुलडाणा तालुक्यासाठी तहसिल कार्यालय बुलडाणा, चिखलीकरीता तहसिल कार्यालय चिखली, सिंदखेड राजा तहसिल कार्यालय, मेहकर तहसिल कार्यालय, लोणार तहसिल कार्यालय, मलकापूर तहसिल कार्यालय, खामगांव तहसिल, शेगांवसाठी तहसिल कार्यालय शेगांव आणि संग्रामपूर तालुक्याकरीता तहसिल कार्यालय, संग्रामपूर राहणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी २३ जूनला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 2:26 PM