धाड-धामणगाव रोडवरील पूल धोकादायक

By admin | Published: June 23, 2017 06:36 PM2017-06-23T18:36:52+5:302017-06-23T18:36:52+5:30

गेल्या २० ते २२ वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या धाडनजीक बाणगंगा नदीवरील पुलामुळे रहदारी आणि नागरीवस्तीस धोका निर्माण झाला आहे.

The pool on Dhad-Dhamangaon road is dangerous | धाड-धामणगाव रोडवरील पूल धोकादायक

धाड-धामणगाव रोडवरील पूल धोकादायक

Next
>ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 23 - गेल्या २० ते २२ वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या धाडनजीक बाणगंगा नदीवरील पुलामुळे रहदारी आणि नागरीवस्तीस धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या सुरक्षेबाबत चिखली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्यापपर्यंत कुठलीच उपाययोजना न केल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नदीचे पाणी या पुलावरुन वाहते. 
 
शिवाय परिसरातील कचरा पुलात अडकत असल्यामुळे हा पूल नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. धाडनजीक धामणगाव धाड रोडवर बाणगंगा नदीवर करडी धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या साडव्याचे पाणी ही गावलगत जुन्या फरशी परिसरात येऊन पोहोचल्यामुळे त्यावेळी चिखली सार्वजनिक बांधकाम विभागाने घाईघाईत सिमेंटची पाईप टाकून बाणगंगा नदीवर २० फुट रूंदीचा आणि साधारण २०० फुटापेक्षा अधिक लांबीच्या पुलाचा पूल बांधला.
 
पुलाची उंची कमी असल्यामुळे जास्त पाऊस झाला की, या पुलापर्यत धरणाचे पाणी येवून साचले आणि नदीला पूर आला की, पुलामध्ये काडीकचरा, गाळ, झाडी-झुडपे अडकून पुराचे पाणी पुलावरुन वाहते, ब-याच वेळा हे पाणी गावात शिरले, त्यामुळे या पुलाची एक बाजू ढासळून गेली. त्यामुळे पुलावरुन पाणी वाहत असताना पाण्यात वाहने कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
 
सुरूवातीच्या काही वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक उन्हाळ्यात पुलातील गाळ, साचलेला कचरा साफ करून पुलाचे पाईप मोकळे करण्याचा नियमित उपक्रम चालू ठेवला होता. परंतु मागील तीन काहीवर्षापासून हा उपक्रम बंद झाला आहे. या ठिकाणी बांधकाम विभागाकडून नवीन पुलासाठी सर्वेक्षण केले होते. परंतु आजपर्यंत नवीन पूल बांधकामावर चालू झाले नाही.
 
रस्ते आणि पुल हे प्रगतीसाठी पुरक ठरत असून शासनाने पुलांचे निर्मितीस प्राधान्यक्रम देत आहे. मात्र धाडमधील महत्वाचे मार्गावरील रहदारीचा पुल मात्र गेल्या २० वर्षापासून धोक्याचा ठरला आहे. आज या पुलात मोठ्या प्रमाणात गाळ, झुडपे,कचरा अडकून पडून पाईप बंद झाली आहे. अतिवृष्टी झाल्यास नदीस पुर आला तर या पुराचा धोका या परिसरातील नागरिकांना होऊन शकतो. (वार्ताहर)

Web Title: The pool on Dhad-Dhamangaon road is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.