लोकमत न्यूज नेटवर्क डोणगाव : येथून जवळच असलेल्या अंजनी बुद्रुक येथे येथे ग्रामपंचायतमधील पोस्ट ऑफिसला अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत महत्त्वाचे दस्तऐवज आणि साहित्य जळाल्याने दोन लाख रुपयाचे नुकसान झालेे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. पोस्ट ऑफिसमधील आगीत संपूर्ण कागदपत्रे, १६ हजार रुपये, इतर साहित्यासह १९७० ते २०१५ पर्यंतचे लाकडी कपाटामध्ये असलेले रेकॉर्ड, एक जुना बेंच, दोन खुर्च्या, पशुसंवर्धन विभागातील दवाखान्यामधील औषधी सलाईन अंदाजे ५० हजार रुपये तसेच १९९९ पासूनचे आजपर्यंतचे रेकॉर्ड जळाले. पोस्ट ऑफिस पशुसंवर्धन दवाखाना व ग्रामपंचायतमधील सामान असे एकूण दोन लाख रुपयाचे नुकसान सदर आगीमध्ये झाले. आगीची बातमी कळताच गावकऱ्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. घटनास्थळी डोणगाव पोलीस स्टेशनचे एस. आय. अशोक नरोटे , पो. कॉ. नितीन खराडे, पवन गाभणे, दिलीप राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला पाचारण केले.
अंजनी बुद्रुक येथे पोस्ट ऑफिसला आग; दोन लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2021 11:51 AM