आमदारांनीच खांबावर चढून जोडला वीज पुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:51 AM2017-09-26T00:51:54+5:302017-09-26T00:52:12+5:30

चिखली: अघोषित भारनियमना पाठोपाठ विद्युत वितरण कं पनीने ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा  कुठलीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीरपणे तोडण्याचा प्रकार  चालविला असून, चिखली तालुक्यातील सुमारे १२१ पाणी पुरवठा योजनेचे वीज कनेक्शन तोडल्याने सर्व तालुकाभर  िपण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण जनततेचे हाल सुरू झाले आहे.   याची गंभीरतेने दखल घेत आमदार राहुल बोंद्रे यांनी आक्रमक  भूमिका घेत विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालया ठिय्या  आंदोलन करण्यासह संबंधित विभागाने खंडित केलेला वीज  पुरवठा स्वत: विद्युत खांबावर चढून पूर्ववत सुरू केला.

Power supply was added to the pole! | आमदारांनीच खांबावर चढून जोडला वीज पुरवठा!

आमदारांनीच खांबावर चढून जोडला वीज पुरवठा!

Next
ठळक मुद्देमहावितरणच्या मनमानी विरोधात बोंद्रे आक्रमक!खांबावर चढून वीज पुरवठा सुरू केला

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: अघोषित भारनियमना पाठोपाठ विद्युत वितरण कं पनीने ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा  कुठलीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीरपणे तोडण्याचा प्रकार  चालविला असून, चिखली तालुक्यातील सुमारे १२१ पाणी पुरवठा योजनेचे वीज कनेक्शन तोडल्याने सर्व तालुकाभर  िपण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण जनततेचे हाल सुरू झाले आहे.   याची गंभीरतेने दखल घेत आमदार राहुल बोंद्रे यांनी आक्रमक  भूमिका घेत विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालया ठिय्या  आंदोलन करण्यासह संबंधित विभागाने खंडित केलेला वीज  पुरवठा स्वत: विद्युत खांबावर चढून पूर्ववत सुरू केला.
सद्यस्थितीत नवरात्र उत्सव सुरू आहे, दसरा, दिवाळी जवळ  आली आहे, अशा सणासुदीच्या तोंडावर ग्रामीण भागातील  पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा प्रकार  वीज वितरण कंपनीने चालविला आहे. ग्रामपंचायतीने विजेचे  बिल भरले नाही असे कारण जरी यामागे असले तरी, त्यासाठी  कुठलीही पूर्वसूचना न देता ग्रामपंचायतची वसुली नसताना  तसेच महत्त्वाची बाब म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीची  आचारसंहिता लागलेली असताना हा प्रकार होत आहे. विशेष  म्हणजे तालुक्यातील तब्बल १२१ पाणीपुरवठय़ाचे कनेक्शन  तोडण्यात आले असून, यापैकी तब्बल ९0 टक्के अधिक कने क्शनला वीज मीटर नसतानाही, अंदाजे मागील कार्यकाळाची  बिले आकारण्यात आलेली आहेत.  त्यावर दंड आणि व्याजही  लावण्यात आलेला आहे. या मनमानी प्रकारामुळे ग्रामपंचायतींना  बिल भरणे सध्या शक्य नसल्याने मूळ वीज बिल हिशोबासह  देण्यात यावे, रीडिंग नसताना अंदाजे बिल आकारले गेले आहे ते  योग्य करण्यात यावे, वीज बिलाचा हिशोब ग्रामपंचायतींना  देण्यात यावा, नगर परिषदेला ज्या पद्धतीने १४ व्या वित्त  आयोगातील पैसा या कामी वापरता येतो तसाच ग्रामपंचाय तींनाही अधिकार देण्यात यावा, दरमहा रीडिंग घेऊनच नियमित  बिल देण्यात यावे, या मागण्यांबरोबरच खंडित केलेला वीज पुरवठा तत्काळ सुरू करण्यात यावा व यापुढे पूर्वसूचना न देता  वीजपुरवठा खंडित करू नये या मागणीसाठी आमदार राहुल बोंद्रे  यांच्या नेतृत्वात गावोगावचे सरपंच, ग्रा.पं. सदस्य व काँग्रेस  पदाधिकार्‍यांनी  २५ सप्टेंबर रोजी विद्युत वितरण कंपनीच्या  कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, नेहमीप्रमाणे या  कार्यालयात विद्युत वितरण कंपनीचा कुठलाही जबाबदार  अभियंता हजर नसल्याने त्यांनी तेथूनच भ्रमणध्वनीद्वारे  अधीक्षक अभियंत्यांची संपर्क साधून सदर प्रकरणी जाब  विचारला. त्यावर कार्यकारी अभियंता रामटेके यांनी आ. बोंद्रे  यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली असता या प्रकाराबाबत ता तडीने उचित कारवाई करण्यासह ग्रामपंचायतींची माफी मागावी  अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आ.  बोंद्रे यांनी यावेळी दिला. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती डॉ.  सत्येंद्र भुसारी, अशोक पडघान, ज्ञानेश्‍वर सुरूशे, समाधान सु पेकर, लक्ष्मण आंभोरे, ईश्‍वर इंगळे, शिवनारायण म्हस्के,  कैलास खंदारे, भारत म्हस्के, जीवन देशमुख, प्रमोद पाटील  यांच्यासह विद्युत जोडणी खंडीत करण्यात आलेल्या  ग्रामपंचाय तीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. 

खांबावर चढून वीज पुरवठा सुरू केला
विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयातील ठिय्या आंदोलनानंतरही  खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याबाबत संबंधित  कार्यालयाकडून होणारी दिरंगाई पाहता आमदार राहुल बोंद्रेंनी  आक्रमक भूमिका घेत तालुक्यातील हातणी येथील पाणीपुरवठा  योजनेचा खंडित केलेला वीजपुरवठा स्वत: खांबावर चढून  पूर्ववत सुरू केला. तसेच याच पद्धतीने वीजपुरवठा खंडित  करण्यात आलेल्या गावातील नागरिकांनी व ग्रामपंचायत  पदाधिकार्‍यांनी स्वत: विद्युत पुरवठा जोडून घ्यावा, होणारे  परिणाम व खटल्याची पर्वा करू नये.  या बेकायदेशीर वीज पुरवठा खंडित करण्याच्या प्रकारात आपण सर्वतोपरी  गावकर्‍यांच्या सोबत असून, त्यांना सहाय्य करणार असल्याचे  आवाहनदेखील आ. बोंद्रे यांनी केले आहे.

Web Title: Power supply was added to the pole!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.