लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दुष्काळी गावातील पाणीपुरवठा योजनांची वीज देयके टंचाई अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून भरणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एक हजार १९५ नळ योजनांची ही वीज देयके महावितरणला अदा करण्यात आली आहे. त्यासाठी बुलडाणा जिल्ह्याला दोन कोटी ४८ लाख १६ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता.त्यापैकी एक कोटी ७५ लाख ५९ हजार ९९२ रुपये नळ योजनांच्या थकीत देयकापोटी महावितरणकडे भरणा करण्यात आल्याने नळ योजनांद्वारे टंचाई काळात पाणीपुरवठा करण्यास आता अडचण राहलेली नाही. दुष्काळ घोषित झालेल्या क्षेत्रातील नोव्हेंबर २०१८ ते जून २०१९ या आठ महिन्याच्या कालावधीत ग्रामीण तथा नागरी भागातील चालू वीज देयके टंचाई अंतर्गत प्राप्त निधीतून भरणा करण्याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने एका परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले होते. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अनुषंगीक अंमलबजावणी केली आहे. नोव्हेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंतची देयके अदा करण्यात आली आहे. प्रती ग्रामपंचायत किमान १८० रुपये ते जवळपास १२ हजार रुपयापर्र्यंत प्रतिमाह एक हजार १९५ नळ योजनांची वीज देयके येतात. ही देयके ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याकडून महावितरणला ती अदा करण्यात येऊन संबंधित ग्रामपंचायतींना त्याची कल्पना देण्यात येते. दरम्यान या योजनेतंर्गत दुष्काळी गावातील थकीत वीज देयकाअभावी बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना थकित देयकाच्या मुद्दला्या रकमेपैकी पाच टक्के इतकी रक्कम भरून योजनांचा पाणीपुरवठा ही या अंतर्गत पूर्ववत करता येतो. मात्र थकित वीज देयका अभावी एकही योजना जिल्ह्यात बंद नव्हती.जून २०१९ पर्यंतची नळ योजनांची देयके टंचाई निधीतून भरणा करण्यासाठी आता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने राज्य शासनाकडे अनुमती मागितील आहे. ती मिळाल्यास जून पर्यंतची देयके अखर्चित निधूतून भरण्यात येणार आहेत, तसा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे.प्राप्त निधी बँकेत पडून राहणार नाही, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना असून प्रसंगी तसा प्रकार झाल्यास तात्पुरता अपहार समजून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सुचना आहेत.
नळ योजनांची थकित वीज देयके टंचाई निधीतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 6:17 PM