सिंदखेड राजा शहरात विजेचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:36 AM2021-03-09T04:36:55+5:302021-03-09T04:36:55+5:30

सिंदखेड राजा: शहरातील पथदिवे दिवसभर सुरू राहत असल्याने विजेचा अपव्यय हाेत असल्याचे चित्र आहे. एकीकडे शासन विजेची बचत करण्याचे ...

Power wastage in Sindkhed Raja city | सिंदखेड राजा शहरात विजेचा अपव्यय

सिंदखेड राजा शहरात विजेचा अपव्यय

Next

सिंदखेड राजा: शहरातील पथदिवे दिवसभर सुरू राहत असल्याने विजेचा अपव्यय हाेत असल्याचे चित्र आहे. एकीकडे शासन विजेची बचत करण्याचे आवाहन करते, तर दुसरीकडे नगरपालिकेकडून विजेचा अपव्यय हाेत आहे.

सिंदखेड राजा शहरातील असंख्य स्ट्रीट लाईट दिवसा सुरू असल्याने विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. केवळ स्ट्रीट लाईटच नाही तर अनेक हाय मॉक्स लाईटदेखील दिवसा सुरू असल्याने पालिकेच्या या हलगर्जीची चर्चा होत आहे.

लोड शेडींग हा शब्द सर्वांना माहीत आहे. विजेची कमतरता असल्यामुळे मोठमोठ्या शहरात लोड शेडिंग करण्यात येते. आजही असंख्य खेडी, वाडी, वस्तीवर विजेअभावी शेतकरी त्रस्त आहेत. शहरात बऱ्याचवेळा वीज खंडित झाल्यानंतर वीज कार्यालयात लगेच फोन जातात. वीज खंडित झाल्याची चौकशी केली जाते. अशा परिस्थितीत दिवसा सुरू असलेल्या दिव्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष होणे अक्षम्य प्रकार आहे. शहरातील रामेश्वर मंदिर, शनी मंदिर, जिजामाता नगर या भागातील दिवे आजही दिवसा सुरू आहेत. याबाबत अनेकांनी पालिकेला माहिती दिली; मात्र कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.

एक महिन्यापासून दिवा सुरूच

श्री रामेश्वर मंदिरसमोरील हाय मास्ट दिवा तब्बल एक महिन्यापासून दिवस-रात्र सुरू आहे. मंदिर कर्मचाऱ्यांनी याबाबत पालिकेला माहिती दिली; पण अजूनही हा मोठा लाईट सुरू असल्याने पालिका याबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे.

दरम्यान, यासंदर्भात पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी दिवे बंद करण्याची जबाबदारी वीज वितरण कार्यालयाची असल्याचे म्हटले आहे. वीज वितरण कंपनीला यासंदर्भात अनेक वेळा पत्र दिले असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे; मात्र पालिका आणि वीज वितरण कंपनीच्या या टोलवाटोलवीत विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो आहे.

Web Title: Power wastage in Sindkhed Raja city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.