प्रतापराव जाधव यांनी केली शेतात ई-पीक पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:41 AM2021-09-09T04:41:35+5:302021-09-09T04:41:35+5:30

या वर्षापासून महाराष्ट्र शासनाने ई-पीक पाहणी हा प्रकल्प कार्यान्वित केला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले ...

Prataprao Jadhav conducts e-crop inspection in the field | प्रतापराव जाधव यांनी केली शेतात ई-पीक पाहणी

प्रतापराव जाधव यांनी केली शेतात ई-पीक पाहणी

Next

या वर्षापासून महाराष्ट्र शासनाने ई-पीक पाहणी हा प्रकल्प कार्यान्वित केला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. या प्रकल्पामधून सर्व पीक नोंदी या शेतकऱ्यांनी स्वतः घ्यायच्या असून, शेतकऱ्यांना शेतात जाऊन अँड्रॉइड मोबाईलमधून ई-पीक पाहणी नावाच्या ॲप्लिकेशनमधून पीक भरावे लागणार आहे. याकरिता अतिशय सुलभ अशी प्रणाली विकसित करण्यात आलेली असून, गुगल प्ले स्टोअरवर ई-पीक पाहणी नावाने ही प्रणाली निःशुल्क उपलब्ध आहे. हे ॲप्लिकेशन सोपे असून, सर्व शेतकऱ्यांनी या माध्यमातून लवकरात लवकर ही पीक पाहणी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ई-पीक पाहणी करतेवेळी मेहकरचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, तहसीलदार डॉ. संजय गरकल, अजय उमाळकर व इतर उपस्थित होते.

पीक पाहणी झाली नाही तर गाव नमुना बारा हा भरला जाणार नाही. त्यामुळे भविष्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी शक्यता लक्षात घेता ही पीक पाहणी शेतकऱ्यांनी करावी.

डॉ. संजय गरकल, तहसीलदार, मेहकर.

Web Title: Prataprao Jadhav conducts e-crop inspection in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.