गर्भलिंग निदान, मुलीचा गर्भ असल्यास पाडण्यासाठी छळ

By अनिल गवई | Published: April 3, 2024 05:25 PM2024-04-03T17:25:25+5:302024-04-03T17:26:25+5:30

विवाहितेच्या तक्रारीवरुन सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा

pregnancy diagnosis torture to abort a girl pregnancy in buldhana | गर्भलिंग निदान, मुलीचा गर्भ असल्यास पाडण्यासाठी छळ

गर्भलिंग निदान, मुलीचा गर्भ असल्यास पाडण्यासाठी छळ

अनिल गवई,  खामगाव (बुलढाणा) : गर्भधारणा झाल्यानंतर गर्भलिंग निदान तसेच मुलीचा गर्भपात करण्यासाठी एका २९ वर्षीय विवाहितेचा अन्ववित छळ करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलीसांनी विवाहितेच्या तक्रारीवरून सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, स्थानिक बोबडे कॉलनी माहेर असलेल्या योगिता श्रीकृष्ण पखाले या विवाहितेचा श्रीकृष्ण रामदास पखाले ३३ रा. बोर्डी ता. अकोट जि. अकोला याच्याही झाला. लग्नानंतर विवाहिता सासरी नांदावयास गेली. दरम्यान, विवाहितेला गर्भधारणा झाली. 

गर्भधारणाझाल्यानंतर सासरच्या मंडळींनी गर्भलिंग निदानासाठी ितच्यावर दबाव टाकला. तसेच मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात करण्यासाठी अन्ववित छळ केला. गर्भपात न केल्यास घटस्फोटाची मागणी करीत, अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विवाहितेने तक्रारीत केला. या तक्रारीवरून शहर पोलीसांनी पती श्रीकृष्ण रामदास पखाले, सासरा रामदास सूर्यभान पखाले, सासू शालीनी रामदास पखाले, दिर िवष्णू रामदास पखाले, दिराणी रचना विष्णू पखाले सर्व रा. नागास्वामी मंदिरासमोर बोर्डी ता. अकोट नणंद शितल गणेश ठोंबरे, गणेश ओंकार ठोंबरे रा. शासकीय निवासस्थान लेडी हार्डींग समोर यांच्याविरोधात भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

तीन वर्ष छळ, घटस्फोटासाठी दबाव-

विवाहितेचा २६ डिसेंबर २०२१ ते १७ जानेवारी २०२४ या कालावधीत सतत छळ करण्यात आला. पती कडून घटस्फोटासाठी विवाहितेवर दबाव टाकण्यात आला. तसेच सोन्याची चेन आणण्यासाठी तगादा लावत पती, सासू आणि सासर्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत विवाहितेने केला आहे.

Web Title: pregnancy diagnosis torture to abort a girl pregnancy in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.