रासायनिक खतांचे भाव वाढले; शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 02:59 PM2019-05-29T14:59:30+5:302019-05-29T15:03:26+5:30

खामगाव: बुलडाणा जिल्हयात सध्या तीव्र दुष्काळाचे सावट आहे. खरीप हंगामाचा सामना कसा करावा हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असतानाच अचानक रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

Prices of chemical fertilizers increased; Farmers nervous | रासायनिक खतांचे भाव वाढले; शेतकरी चिंताग्रस्त

रासायनिक खतांचे भाव वाढले; शेतकरी चिंताग्रस्त

googlenewsNext

- विक्रम अग्रवाल
खामगाव: बुलडाणा जिल्हयात सध्या तीव्र दुष्काळाचे सावट आहे. खरीप हंगामाचा सामना कसा करावा हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असतानाच अचानक रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
्रगतवर्षी समाधानकारक पीक न झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. त्यात पीककर्जासाठी अर्ज करूनही अनेक शेतकºयांचे कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे पाऊस झाल्यानंतर खरिपातील पिकांची पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकºयांसमोर आहे. त्यामुळे शेतीचे उत्पादन खर्चही वाढणार आहे. ही बाब ऐन दुष्काळात शेतकºयांची चिंता वाढवणारी ठरणार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेतकरी खरीप हंगामातील पेरणीपूर्वी शेतीच्या मशागतीची कामे आटोपून घेतात. त्यानंतर मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा असते. साधारण २२ मे नंतर शेतकरी खते व बियाण्यांची खरेदी करतात. उत्पादन चांगले मिळावे यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. सध्या कृषी सेवा संचालकांनी खतांचा व बियाणांचा साठा करून ठेवणे सुरू केले आहे. त्यातच खत कंपन्यांनी दरवाढ केली आहे खत उत्पादक कंपन्यांनी खतांमध्ये ५० किलोच्या बॅग मागे शंभर ते दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शेती पिकांचे उत्पादन खर्चही वाढणार आहे. त्या तुलनेत कोणत्या कोणत्या पिकाला अपेक्षित भाव मिळेल याचीही चिंता शेतकºयांना लागली आहे.

 

   खते (५० किलो)    पूर्वीचे दर    नवीन दर          भाववाढ 
                डिएपी        १२५०     १४४०                     १९०
      १०:२६:२६          ११३५     १४५०                      ३१५
      २०:२०:१३           ९१०    ११००                        १९०
      १२:३२:१६        ११५५    १४७५                         ३२०
      पोटेश                ६७०    ९५०                           २८०
       १८:१८:१०        ८५०    १०५०                         २००    


पिकांच्या वाढीसाठी शेतकरी नियोजन करीत असतो. यावर्षी रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने शेतकºयांच्या आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा खरेदी-विक्रीला मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.
- शिवदास गायकवाड
कृषी केंद्र संचालक

Web Title: Prices of chemical fertilizers increased; Farmers nervous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.