- देवेंद्र ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत आॅनलाईन विमा काढण्याची मुदत २४ जुलैपर्यंत ठरवून देण्यात आलेली आहे. परंतु दरवर्षी निसर्गाचा लहरीपणा पाहता, पेरण्यांना उशीर होत आहे. सध्या विम्याची साईट सुरू असली, तरी शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा होताना दिसत नाही.गतवर्षीचा अनुभव पाहता, तब्बल १८ ते २० जुलैपर्यंत पेरण्या सुरू होत्या. यावर्षी अद्याप पावसाचे आगमन झालेले नाही. त्यामुळे पेरण्यांना गतवर्षी प्रमाणेच उशीर होऊ शकतो. एकीकडे अद्याप पेरण्याच सुरू झालेल्या नाहीत आणि दुसरीकडे विमा भरण्याची २४ जुलैची दिलेली मुदत, यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरण्याचीच चिन्हे आहेत.यावर्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत विमा काढण्यास सुरूवात झाली आहे. पिक काढण्याची मुदत २४ जुलै पर्यंत आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. गतवर्षीही पावसाळा उशीरा सुरू झाल्याने तब्बल १८ ते २० जुलै पर्यंत पेरण्या सुरू होत्या. त्यामुळे अनेक शेतकºयांना पिक विमा काढणे शक्य झाले नाही. नंतर काही दिवसांसाठी मुदत वाढविण्यात आली होती. परंतु साईट बंद राहत असल्याने त्याचाही फारसा फायदा झाला नाही. यावर्षी सध्या पिक विमा काढण्याकरीता साईट सुरू आहे. परंतु त्याचा सध्या काहीही लाभ शेतकºयांना होताना दिसत नाही. यावर्षी अद्यापपर्यंत पावसाचे आगमन झाले नाही.त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यावर्षी पेरण्यांना उशीर होण्याची शक्यता आहे. पेरण्या आटोपल्यानंतर सर्वच शेतकरी पिक विमा काढण्यासाठी गर्दी करणार आहेत. त्यामुळे शेवटच्या आठवड्यात पिक विमा भरण्यासाठी शेतकºयांची मोठी गर्दी होऊन शेतकºयांना पिक विम्यापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे पिकाला संरक्षण देण्यासाठी असलेली प्रधानमंत्री पिकविमा योजना शेतकºयांसाठी मृगजळ ठरण्याची चिन्हे आहेत.उशीरा होणाºया पेरण्या लक्षात घेता, त्यानुसारच पिक विमा काढण्याची मुदत ठरवून द्यावी व नियोजन करावे, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.मुदतवाढीनंतर राज्यावर बोजा!प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत केंद्राने ठरवून दिलेल्या मुदतीच विमा काढणे बंधनकारक राहते. राज्य शासन त्यांच्या पातळीवर मुदत वाढवून देतेही; परंतु मुदतवाढीच्या काळात काढण्यात आलेल्या विम्याचे पैसे देण्यास केंद्राकडून नकार देण्यात येतो. त्यानंतर राज्य सरकारला विशेष तरतूद करून मुदतवाढीच्या काळात पिकविमा काढलेल्या शेतकºयांना विम्याची रक्कम द्यावी लागते. यामुळे शेतकºयांना पिकविम्याची रक्कम मिळण्यास विलंब होतो, असा शेतकºयांचा अनुभव आहे.गतवर्षी पावसाचे आगमन उशीरा झाल्याने पेरण्या उशीरा झाल्या. यानंतर पिकविमा काढण्यासाठी एकच गर्दी झाली. यात वेबसाईटही बंद राहत असल्याने पिकविमा काढण्यात अडचणी निर्माण झाल्या.- नंदकिशोर देशमुखशेतकरी, एकलारा बानोदा ता.संग्रामपूर.यावर्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत विमा काढणे सुरू झाले आहे. २४ जुलै ही मुदत ठरवून देण्यात आली आहे. शेतकºयांनी शक्यतो मुदतीच्या आत पिक विमा काढावा.- नरेंद्र नाईकजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
प्रधानमंत्री पिक विमा योजना ठरतेय मृगजळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 3:54 PM