देऊळगाव राजात पावसाळ्यात पाणीपुरवठ्याचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:35 AM2021-09-11T04:35:32+5:302021-09-11T04:35:32+5:30

देऊळगाव राजा शहराची लोकसंख्या ३० हजार ८२७ असून, या ठिकाणी नळकनेक्शन तीस हजार ६७ आहे. दरडोई ७० लिटरप्रमाणे पाणीपुरवठा ...

Problem of water supply in Deulgaon Raja during monsoon | देऊळगाव राजात पावसाळ्यात पाणीपुरवठ्याचा प्रश्न

देऊळगाव राजात पावसाळ्यात पाणीपुरवठ्याचा प्रश्न

Next

देऊळगाव राजा शहराची लोकसंख्या ३० हजार ८२७ असून, या ठिकाणी नळकनेक्शन तीस हजार ६७ आहे. दरडोई ७० लिटरप्रमाणे पाणीपुरवठा करावा, असे योजनेत स्पष्ट केलेले आहे. या ठिकाणी खडकपूर्णा धरणावरून ताशी दोन लाख ५० हजार लिटर पाणी ओढण्याची मशिनरी देखील बसविलेली आहे आणि एक्सप्रेस फिडर देखील बसविलेले आहे. ही पंपिंग मशीन दहा तास जरी चालली तरी शहरास २५ लाख लिटर पाणी उपलब्ध होऊ शकते. अशा परिस्थितीत येथील पाण्याची साठवणूक क्षमता १३ लाख ७० हजार लिटर असून, दिवसभरात या टाक्या दोन वेळेस भरल्या जाऊ शकतात व शहराला लागणारा पाणीपुरवठा सुरळीत व दररोज मिळू शकतो.

आंदोलनाचा इशारा

देऊळगाव राजा शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यास बंदी आदेश नगरपरिषद प्रशासनाने द्यावे, जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत पाणीपट्टी माफ करावी, या संबंधित कारवाई त्वरित न झाल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल सावजी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Web Title: Problem of water supply in Deulgaon Raja during monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.