लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या काळेगाव येथे १२ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता नवरदेवाची मिरवणूक काढल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नवरदेव, नवरीसह दोघांच्याही आई-वडिलांसह गुन्हा दाखल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काळेगाव येथे सोमवारी नवरदेवाची मिरवणूक वाजतगाजत मोठ्या गर्दीसह मंडपाकडे जात असताना पोलिसांना दिसून आली. लग्न समारंभाकरिता केवळ ५० जणांची परवानगी असताना मोठ्या गर्दीसह मिरवणूक काढली होती. त्यामुळे याप्रकरणी पोना. अनिल इंगळे यांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वसंता नथ्थुजी खंडारे, निर्मला वसंता खंडारे, आरती वसंता खंडारे (तिघे रा.काळेगाव), दिलीप तायडे, शीला दिलीप तायडे, भीमराव दिलीप तायडे (रा.बुलडाणा) यांच्याविरुद्ध कलम १८८, २६९, २७०, २७१ भादंवि सहकलम आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ व नुसार गुन्हा दाखल केला आहे.
नवरदेवाची मिरवणूक; सहा जणांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 11:46 AM
Khamgaon News : नवरदेव, नवरीसह दोघांच्याही आई-वडिलांसह गुन्हा दाखल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्दे५० जणांची परवानगी असताना मोठ्या गर्दीसह मिरवणूक काढली होती.आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ व नुसार गुन्हा दाखल केला आहे.