१९९६ पूर्वीच्या पीएचडी धारक प्राध्यापकांना दोन वेतनवाढ मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 05:15 PM2020-10-14T17:15:31+5:302020-10-14T17:18:34+5:30
१ जानेवारी १९९६ पूर्वी पीएच.डी.अर्हता धारण करणाºया प्राध्यापकांना दोन वेतनवाढी देण्यात येणार आहेत.
बुलडाणा : उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार १ जानेवारी १९९६ पूर्वी पीएच.डी.अर्हता धारण करणाºया प्राध्यापकांना दोन वेतनवाढी देण्यात येणार आहेत. याविषयी शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी सर्व विभागीय संचालकांना १२ आॅक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे.
Þ१ जानेवारी १९९६ पूर्वी पीएच.डी.अर्हता धारण करणाºया प्राध्यापकांना वेतनवाढ मिळाली नव्हती. त्यामुळे, प्राध्यापकांच्या संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी उच्च न्यालयाने प्राध्यापकांच्या बाजुने निकाल दिला होता. त्यानुसार शासनाने १३ सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यानुसार १९९६ पूर्वी पीएच.डी अर्हता धारण करणाºया प्राध्यापकांना दोन अगाउ वेतनवाढीचे लाभ देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, शासनाच्या या निर्णयाची काही विभागीय संचालकांनी अंमलबजावणी केली नसल्याचे असोसिएशन आॅफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी सुपूर अॅन्यूएटेड टीचर्स या संघटनेने शिक्षण संचालकांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावर शिक्षण संचालकांनी १२ आॅक्टोबर रोजी सर्व विभागीय सह संचालकांना अध्यापकीय कर्मचाºयांना पीएच.डीच्या दोन वेतनवाढीचे लाभ १ जानेवारी १९९६ पासून आपल्या स्तरावर अदा करण्याचे आदेश दिले आहेत.