- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या खामगाव नगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रश्न आता आणखी ऐरणीवर आला आहे. शहरानजीकच्या पाच ग्रामपंचायतींचा खामगाव शहराच्या हद्दीत समावेश करण्याच्या हालचालींनी आता वेग घेतला असून, प्रशासनाच्यावतीने उपाययोजना केल्या जात आहेत.खामगाव नगरपालिकेची हद्दवाढ गत दिवसांपासून रखडली असून, हद्दवाढीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. खामगाव पालिकेची हद्दवाढ रखडल्यामुळे खामगावकरांच्या मूलभूत सुविधांवर शहरानजीकच्या ग्रामपंचायतीचा ताण पडत आहे. त्यामुळे शहरानजीकच्या ५ गावांचा समावेश असलेला हद्दवाढीचा प्रस्ताव शासनस्तरावर सादर करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या मुद्द्यावर स्थानिक लोकप्रतिनिधीही सकारात्मक असून, त्यामुळे जिल्हा स्तरावरदेखील हद्दवाढीच्या हालचालींनी वेग घेतला आहे. खामगाव शहराची हद्दवाढ झाल्यास स्थानिक राजकारणात राजकीय उलथापालथ होणार असल्याचे संकेत आहेत. खामगाव पालिकेची सध्याची ३३ सदस्यसंख्या हद्दवाढीमुळे ३७ पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
खामगाव शहराच्या हद्दवाढीच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या जात आहेत. हद्दवाढ प्रक्रियेच्या अनुषंगाने अत्यावश्यक नकाशे आणि इतर कामकाज पूर्णत्वास नेण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.- मनोहर अकोटकरमुख्याधिकारी, नगरपरिषद, खामगाव.