ब्रह्मनंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सातत्याने अवर्षणसदृश स्थितीचा सामना करणार्या बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी गाठली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी सात तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असल्याने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या असून, जमिनीतील ओलावा गहू पिकासाठी पोषक ठरत आहे. जिल्ह्यात सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात असून, खरीप हंगामानंतर आता शेतकरी रब्बीच्या तयारीला लागला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र ९२ हजार ८५१ आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसावरच खरिपाची िपके तग धरून होती. मध्यंतरी पावसाने पाठ फिरवल्याने जलसाठय़ांनीसुद्धा तळ गाठला होता; परंतु परतीच्या पावसाने जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी भरून काढली आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामाला संजीवनी मिळाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १00.६७ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मलकापूर, मोताळा आणि जळगाव जामोद या सात तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. बुलडाणा तालुक्यात १३१.८0 टक्के, चिखली १0२.४९ टक्के, देऊळगाव राजा १0७.२६, सिंदखेड राजा १0३.७५ टक्के, लोणार ८९.५२ टक्के, मेहकर ९३.२१ टक्के, खामगाव ९५.३१ टक्के, शेगाव ७३.१६ टक्के, मलका पूर ११0.११ टक्के, नांदुरा ९६.५५ टक्के, मोताळा १0१.३७ टक्के, संग्रामपूर ८५.९४ टक्के, जळगाव जामोद ११६.२५ ट क्के पर्जन्यमान झालेले आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली असल्याने जलस्रोतामध्ये चांगला जलसाठा आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये रब्बी हंगामाची पिके घेण्यासाठी शेतकरी जोमाने तयारी करत आहे.
जिल्ह्यात ९२ हजार ८५१ हेक्टर रब्बीचे क्षेत्रजिल्ह्यात रब्बी हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र ९२ हजार ८५१ हे क्टर आहे. त्यामध्ये जळगाव जामोद तालुक्याचे ४ हजार ८३२, संग्रामपूर ४ हजार २३८, चिखली तालुक्यात २५ हजार ९१, बुलडाणा १७ हजार ५२१, देऊळगाव राजा १२ हजार १७७, मेहकर २४ हजार २१, सिंदखेड राजा १0२४३, लोणार १४ हजार ६0८, खामगाव ८ हजार ७४६, शेगाव ४ हजार ३0३, मलकापूर तालुक्यात २ हजार २५८, मोताळा ३ हजार ७७१, नांदुरा २ हजार ५८४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.
रब्बी पेरणीला सुरुवात जिल्ह्यात सोयाबीन काढणीच्या हंगामानंतर आता रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी शेतीची मशागत करण्याचे काम जोमात सुरू आहे. रब्बी पेरणीपूर्वी शेत वखरण्याचे काम सध्या जोमात सुरू आहे, तर काही ठिकाणी रब्बी पेरणीला सुरूवातही झाली आहे.