गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर बुलडाण्यात भाजप-शिवसेनेत राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:32 AM2021-04-19T04:32:18+5:302021-04-19T04:32:18+5:30
दुसरीकडे आ. संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनीही या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसात तक्रार दिली असून माजी आ. ...
दुसरीकडे आ. संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनीही या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसात तक्रार दिली असून माजी आ. शिंदे यांनीही आपल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढविल्यासंदर्भात तक्रार दिली आहे. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. दुसरीकडे पोलिस प्रशासनाकडूनही उभय गटांविरोधात संचारबंदीचा भंग तथा आपत्तीव्यवस्थापन कायदा आणि साथरोग नियंत्रण कायद्याचा आधार घेत गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती ठाणेदार प्रदीप साळुंके यांनी ‘लोकमत’शी बोलताा दिली. घटनेचा गांभीर्य पाहता अप्पर पोलिस अधीक्षक बजरंग बनसोड, एसडीपीओ रमेश बरकते यांनी पोलिस ठाण्यात ठाण मांडले आहे.
--फडणवीस व कुटे यांच्या पुतळ्याचे दहन--
बुलडाण्यातील या घटनेनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी मोताळा आणि सिंदखेडराजा येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तर बुलडाण्यात भाजपचे माजी मंत्री संजय कुटे यांच्या पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे सध्या उभय बाजूंनी वातावरण तणावपूर्ण असल्याचे चित्र आहे.
--काय आहे प्रकरण--
आ. संजय गायकवाड यांनी कोरोनासंदर्भात भाजप करत असलेल्या राजकारणाविरोधात वक्तव्य केले. त्यावेळी त्यांनी ‘कोरोनाचे जंतू सापडले तर फडणवीसांच्या तोंडात टाकले असते’ असे वक्तव्य केले होते. सोबतच भाजपच्या नेत्यांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर हे संपूर्ण राजकारण पेटले आहे.