जानेेेफळ : सडवा व मोहापासून हातभट्टीची गावरान दारू विक्री करणाऱ्यांवर जानेफळ पोलिसांनी कारवाई केली़ पाेलिसांनी तीन दिवसांपासून मोहीम राबवीत विविध तीन ठिकाणी सुरू असलेले गावरान दारू अड्डे नष्ट करून तिघाजणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
घाटनांद्रा व देऊळगाव साकर्शा येथे काहीजण सडवा व मोहापासून हातभट्टीची गावरान दारू गाळून तिची विक्री करीत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली़ या माहितीच्या आधारे ठाणेदार राहुल गोंधे यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह ६ मे २०२१ रोजी घाटनांद्रा (ता. मेहकर) शिवारात धाड टाकून जगतापी नाल्यात दारू गाळत असताना आरोपी अशोक सखाराम तेलगोटे याच्यावर कारवाई केली़ त्याच्या ताब्यातून पाच हजार रुपयांचा ऐवज जप्त केला़ दुसऱ्या घटनेत त्याच गावातील नामदेव रावती वाथे याच्या ताब्यातून १० लिटर गावरान दारूने भरलेली प्लास्टिक कॅन व इतर असा पाच हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला़ ८ मे रोजी तिसऱ्या घटनेत देऊळगाव साकर्शा येथे उतावळी नदीच्या पात्रात गुलाब मुरलीधर वानखेडे (रा. देऊळगाव साकर्शा) हा हातभट्टीची दारू काढत असताना पाेलिसांनी त्यास अटक केली़ पाेलिसांनी विविध कारवायांमध्ये २२ हजार ६५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार राहुल गोंधे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार शरद बाठे, प्रल्हाद टकले, पो.कॉ. विनोद फुपाटे, अमोल बोर्डे, पो. कॉ. दिलीप जाधव, पो.कॉ.शे. इसाक, होमगार्ड सुनील शिंगणे, प्रवीण नवले, आदींनी केली़