ग्रामीण भागातील रस्त्याची दुरवस्था
धाड : परिसरातील ग्रामीण भागाला जाेडणाऱ्या रस्त्याची गत काही वर्षांपासून दयनीय अवस्था झाली आहे़ या रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे़ या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे़
सुंदरखेड येथील डाॅक्टर बेपत्ता
बुलडाणा : शहरापासून जवळच असलेल्या सुंदरखेड भागात राहणारा डॉ. दीपक मोतीराम एकडे (४०) यांचा बुलडाणा तालुक्यातील भादोला येथे दवाखाना आहे. डॉ. दीपक एकडे हे दररोज सुंदरखेड ते भादोला ये-जा करतात. २२ जुलैला डॉ. दीपक एकडे सकाळी आपल्या घरातून भादोला येथे दवाखान्यात गेले. परंतु रात्री ते परत आले नाहीत. त्यामुळे पाेलिसांत तक्रार देण्यात आली आहे़
गुड माॅर्निंग पथके सक्रिय करण्याची गरज
बुलडाणा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गंत काही वर्षांपूर्वी गुड माॅर्निंग पथके सक्रिय करण्यात आली हाेती़ सध्या अनेक गावांमध्ये उघड्यावर शाैचास बसण्याचे प्रकार वाढले आहेत़ त्यामुळे, गुड माॅर्निंग पथके सक्रिय करण्याची गरज आहे़
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज
बुलडाणा : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये अतिवृष्टी हाेऊन पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ नदी, नाल्यांना आलेल्या पुरात पिके वाहून गेली आहेत़ या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी हाेत आहे़
अतिक्रमीत जमिनी नियमाकूल करा
बुलडाणा : अतिक्रमीत जमिनी नियमाकूल करण्यासाठी मंत्रालयात विशेष बैठकीचे आयाेजन करण्यात यावेण अन्यथा १६ ऑगस्ट राेजी चैत्यभूमी ते मुंबई मंत्रालयापर्यंत लाॅग मार्च काढण्याचा इशारा मानवी हक्क सुरक्षा दलाच्यावतीने देण्यात आला आहे.
अंतर्गंत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
बुलडाणा : शहराला लागूनच असलेल्या सुंदरखेड येथील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे़ काही भागात सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत़ काही भागात मात्र चिखल साचला आहे़ याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे़