लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शनिवारी दुपारी खामगाव शहरात पावसाने चांगलाच जोर धरला. त्यामुळे दीपावलीच्या उत्साहावर तर विरजण पडलेच. शिवाय शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.गत आठवड्यापासून खामगाव शहर व परिसरात पाऊस सुरूच आहे. अशातच शनिवारी दुपारी १२ वाजता खामगाव शहरात पावसाने जोर धरला. बाजारपेठेत उत्साह असताना आलेल्या पावसामुळे ग्राहकांसह विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यामुळे बाजारपेठेवर परिणाम झाल्याचे दिसून आहे. दिवाळीच्या पार्श्वभुमिवर बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी आहे. खामगाव शहरातील मुख्य रस्ता ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. सर्वच दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी आहे. अशातच सतत पडणाºया पावसामुळे नागरिक हैराण झाले आहेत. खामगावसह, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव तालुक्यातही शनिवारी पाऊस पडला. सध्या दिवाळी सणाच्या पार्श्वभुमिवर सर्वच शहरे गर्दीने फुलून गेली आहेत. परंतु पावसामुळे वाताहात झाल्याचे दिसून येते. शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेच; परंतु शहरांमध्ये खरेदीसाठी येणारे नागरिकही हैराण झाले आहेत. पोरज येथे उडीद, मूग, तीळ बरोबरच आता ज्वारी व कापसावर ही पाणी फिरले आहे. ज्वारी व सोयाबीनचे पीक हे पावसाने जमीनदोस्त झाले आहे. कपाशी पिकावर संकट आले आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असून ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा अशी मागणी जोर धरत आहे. तालुक्यासह सर्वत्र ही परिस्थिीती असतांना कृषी खात्याने आतापर्यंत शेतकºयांच्या बांधावर येऊन पीक पाहणी केली नसल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली. शासनाने लवकरात लवकर सर्वे करून शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
ज्वारी पिकाचा खर्चही निघत नसून धान्य विकत घेण्याची वेळ आली आहे. कपाशीला ही एकरी पंचवीस हजार रुपये खर्च लागलेला असताना खर्च निघणे कठीण झाले आहे.- विलाससिंह इंगळे,शेतकरी वर्णा.