वृक्षांचे मुलाप्रमाणे संगोपन करा - डोईफोडे
By Admin | Published: June 23, 2017 04:06 PM2017-06-23T16:06:24+5:302017-06-23T16:06:24+5:30
प्रत्येकाने एकतरी वृक्ष लावून त्या वृक्षाचे आपल्या मुलाप्रमाणे संगोपनकरावे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप डोईफोडे यांनीकेले.
मेहकर : अलीकडच्या काळामध्ये सर्वच ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी अधिक होत
आहे. दरवर्षी निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. वृक्षांच्या कत्तलीचे
प्रमाण वाढत असल्याने याचा परिणाम निसर्गावर होत आहे. त्यामुळे
प्रत्येकाने एकतरी वृक्ष लावून त्या वृक्षाचे आपल्या मुलाप्रमाणे संगोपन
करावे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप डोईफोडे यांनी
केले.
२१ जून रोजी स्थानिक पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये वृक्षारोपणाचा
कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डोईफोडे बोलत होते. या कार्यक्रमाला
उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे, ठाणेदार मोतीचंद राठोड, पंढरी
जाधव, समिर शेख, शरद गिरी, देविचंद चव्हाण, उमेश घुगे आदींची उपस्थिती
होती. शासन दरवर्षी वृक्ष लागवडीसाठी विविध उपक्रम राबवित आहे. या
उपक्रमात सर्वांनी सहभाग घेऊन वृक्ष लावण्या संदर्भात नागरिकांमध्ये
जनजागृती केली पाहिजे. केवळ उपक्रम न राबविता प्रत्येकाने एक वृक्ष लावून
त्या वृक्षाचे संगोपन केले पाहिजे, असेही डोईफोडे यांनी सांगितले.
(तालुका प्रतिनिधी)