शासनाच्या २०१२ स्पोर्ट कोडनुसार एक स्टेट एक असोसिएशनच्या शूटिंग बॉल खेळामध्ये एक राज्य एक फेडरेशन घोषित करण्यात आले. त्यानुसार विदर्भ शूटिंग बाॅलचे महाराष्ट्र राज्य शूटिंग बॉल फेडरेशनमध्ये विलीनीकरण करण्यात आले. महात्मा जोतिबा फुले सभागृह नांदगाव, जि. नाशिक या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वागत अध्यक्ष नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनामध्ये सभा पार पडली तसेच शूटिंग बॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव रवींद्र तोमर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. दरम्यान, विदर्भ शूटिंग बॉल फेडरेशन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद शेळके, सचिव शकीलोउद्दीन काजीचे मार्गदर्शनाखाली अकोला संघटनेचे अध्यक्ष राकेश सिंह बयस, सचिव एम. एस. शेख, वाशिमचे त्रिंबक राजे, बुलडाणाचे अशोक चाटे या सर्व विदर्भ अंतर्गत येणारे पदाधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत विदर्भचे महाराष्ट्रामध्ये विलीनीकरण करण्यात आले. राज्याची नवी असोसिएशनची कार्यकारिणी तयार करण्यात आली व मंजुरी देण्यात आली. कार्यकारिणीमध्ये विदर्भाचे चार पदाधिकारी यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये विदर्भाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. रामप्रसाद शेळके यांची महाराष्ट्राच्या राज्य शूटिंग बाॅल असोसिएशन उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच विदर्भचे तत्कालीन सचिव शकीलोउद्दीन काजी यांची महाराष्ट्र राज्य शूटिंग बॉल असोसिएशन कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.