कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी वसंत राठोड, तालुका कृषी अधिकारी रोहिदास मासळकर, देऊळगाव राजा तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी आत्मा अंतर्गत स्थापन झालेल्या शेतकरी गटामार्फत विविध प्रकारच्या २१ रानभाज्याचे प्रकार व त्याचे मानवी आहारातील महत्त्व विषद करून माहिती देण्यात आली. यावेळी देऊळगाव राजा शहरातील नागरिकांनी रानभाज्या पाहणी करण्यासाठी उस्फुर्त प्रतिसाद दिला. रासायनिक खते आणि औषधे वापरून तयार केलेल्या नेहमीच्या भाज्या आहारात घेऊन नागरिकांचे कुपोषण होत असून रानभाज्यांचा आहारात समावेश केल्यास लोकांना सेंद्रिय भाजीपाला, विषमुक्त भाजीपाला तसेच औषधी भाजीपाला यानिमित्ताने उपलब्ध होईल त्यासाठी सर्व लोकांनी या रानभाज्या आपल्या आहारात समावेश करावा तसेच शेतकन्यांनी सुद्धा हे तन नसून या रानभाजी रानमेवा आहे असे समजून पापासून आर्थिक प्राप्ती करून घ्यावी असे आवाहन मेहकर उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी केले. यावेळी बोलताना पंचायत समितीचे सभापती शेटे यांनीही मार्गदर्शन केले़
देऊळगाव राजात रानभाजी महाेत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:35 AM