रद्द झालेल्या परीक्षांचे शुल्क परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:35 AM2021-05-12T04:35:02+5:302021-05-12T04:35:02+5:30
देऊळगाव राजा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने परीक्षा रद्द केल्या आहेत. सध्या कोरोनामुळे शेतकरी, कष्टकरी, ...
देऊळगाव राजा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने परीक्षा रद्द केल्या आहेत. सध्या कोरोनामुळे शेतकरी, कष्टकरी, मजुरांची अवस्था बिकट आहे. शासनाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश जाधव यांनी केली आहे.
शिक्षण विभाग व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य शासनाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. यावर्षी शालांत परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागामार्फत शासनाकडे परीक्षा शुल्क भरले आहेत. कडक निर्बंधांमुळे शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक, मजूर अशा सर्वांची परिस्थिती बिकट आहे. त्यांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी परीक्षा शुल्क भरण्याची तजवीज केली होती, मात्र परीक्षा रद्द करण्याचा निर्णय परीक्षा बोर्ड व शालेय शिक्षण मंत्रालयाने घेतला. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश जाधव यांच्यासह आकाश चित्ते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली आहे.