पावसाने पिकांना दिलासा; सिंचन प्रकल्पांमधील जलसाठाही वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 06:07 PM2018-08-18T18:07:50+5:302018-08-18T18:08:19+5:30
खामगाव : मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने केलेल्या दमदार आगमनाने पिकांना दिलासा मिळाला आहे. घाटाखालील सहा तालुक्यातील सिंचन प्रकल्पांमधिल पाण्याच्या पातळीतही यामुळे वाढ झाली आहे.
- देवेंद्र ठाकरे
खामगाव : मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने केलेल्या दमदार आगमनाने पिकांना दिलासा मिळाला आहे. घाटाखालील सहा तालुक्यातील सिंचन प्रकल्पांमधिल पाण्याच्या पातळीतही यामुळे वाढ झाली आहे.
गेले काही दिवस पावसाने घेतलेली विश्रांती शेतकºयांसाठी चिंतेचा विषय ठरत होती. यामुळे हजारो हेक्टरवरील पिके सुकण्याच्या मार्गावर होती. पावसाने मारलेल्या दडीने दुष्काळाचे सावट पसरले होते. बराच काळ पावसाने खंड दिल्याने पेरणीनंतरची पिकांची आंतरमशागतीची कामेही आटोपली होती. त्यामुळे सर्वच जण पावसाची प्रतीक्षा करीत होते. आधीच तब्बल महिनाभर उशीराने पेरण्या झाल्याने पावसाची नितांत गरज होती. अशातच पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकºयांची चिंता वाढली होती. यावर्षी १०० टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, त्यामुळे सुरूवातीला शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण होते. मात्र जुलैच्या पहिल्याच आठवड्यात हा अंदाज फेल ठरला. पावसाने उघडीप दिल्याने उडीद, मुगाची पिके धोक्यात आली. अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर १६ आॅगष्ट पासून खामगावसह सहाही जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. यामुळे पिकांना जिवदान मिळाले. नागरिकांची तहान भागविणाºया लघु तसेच मध्यम सिंचन प्रकल्पांमध्येही जलसाठा वाढला असून दुष्काळाचे सावट काहीसे कमी झाले आहे. खामगाव तालुक्यात ज्ञानगंगा, तोरणा, मन, मस, जळगाव जामोद तालुक्यातील गोडाळा, धानोरा, राजुरा, नांदुरा तालुक्यातील कंडारी, मलकापूर तालुक्यातील चिखली रणथम यासह इतरही सिंचन प्रकल्पांमधील जलपातळी साधारणपणे २ टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे पिण्याचा प्रश्न सुटण्यास काही अंशी मदत होणार आहे.
चाऱ्याचा प्रश्न मिटणार!
गेल्या तिन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आले. अनेक भागातील नदी-नाले मात्र अद्याप कोरडेच आहेत. जनावरांचा चाºयाचा प्रश्न काही प्रमाणात यामुळे सुटल्याचे दिसून येत आहे. अजुनही जोरदार पाऊस आवश्यक असला, तरी सध्या रानात भरपूर चारा उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. पिकेही आनंदाने डोलत असल्यामुळे भविष्यातील चाºयाचा प्रश्न सुध्दा सुटणार आहे.