अंतर्गत रस्ते विकासासाठी अडीच कोटी मंजूर
देऊळगाव राजा : शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या विकासासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नाने वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत अडीच कोटींचा अनुदान शासनाने मंजूर केले अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिका गटनेते गणेश सवडे यांनी दिली आहे.
दुकाने सुरूच ठेवणाऱ्यांना दंड
मेहकर : मेहकर शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. शासनाच्या नियमाला धुडकावून शहरातील काही बेशिस्त व्यापारी दुकानाचे अर्धे शटर उघडे ठेवून ग्राहकांना आत घेत दुकान सुरू ठेवत आहे. ही माहिती पोलिस उपनिरीक्षक युवराज रबडे यांना मिळाली असता त्यांनी नगरपरिषदेचे कर्मचारी सोबत घेऊन वीस दुकानांवर कारवाई केली आहे.
रोजगार हमी योजनेची कामे सुरू करा
बुलडाणा : तालुक्यातील रोहयोच्या कामांचा सन २०२०-२०२१ चा कृती आराखडा तयार झाला आहे. परंतु कोणत्याही कामांना अद्याप सुरुवात झाली नाही.त्यामुळे, तातडीने राेहयाेच्या कामांना तातडीने सुरुवात करण्याची मागणी हाेत आहे़
अपघातातील जखमींना सभापतींनी केली मदत
सिंदखेडराजा : दोन वाहनांमध्ये अपघात होऊन एक चालक जखमी झाला, तर अन्य किरकोळ जखमी झाले. घटनास्थळावरून जाताना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती पूनम राठोड यांनी हे दृश्य पाहिले आणि तत्काळ जखमींना दवाखान्यात हलवण्यासाठी मदत केली.
हरणाच्या पाडसाला दिले जीवनदान
बुलडाणा : हरणाच्या पाडसाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवत वन्यजीव सोयरेंनी वनविभागाच्या स्वाधीन करून भूतदया दाखवली.
दहीद बु. येथे गणेश पांडे यांच्या शेतात काम करत असताना त्यांना एका हरणाच्या पिल्लाच्या मागे कुत्रे लागले हाेते़ या पाडसाला वन्यजीव साेयरेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने वाचवले
माेताळा येथे ९१ जणांनी केले रक्तदान
माेताळा : येथे काॅंग्रेसच्या वतीने आयाेजित रक्तदान शिबिरात ९१ जणांनी रक्तदान केले़ काेराेनामुळे राज्यभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे़ त्यामुळे, रक्तदान करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले हाेते़ या आवाहनाला प्रतिसाद देत युवकांनी रक्तदान केले़
उटी येथे वादळाचा तडाखा
मेहकर : तालुक्यातील उटी परिसरात ९ मे राेजी सायंकाळी वादळासह पाऊस झाला़ त्यामुळे, शेतकऱ्यांच्या फळबागांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़ आधीच शेतकरी संकटात सापडलेले असताना आणखी एक संकट शेतकऱ्यांवर काेसळले आहे़ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे़
उंद्री येथे ५८ युवकांनी केले रक्तदान
अमडापूर : येथून जवळच असलेल्या उंद्री येथे युवक काॅंग्रेसच्या वतीने आयाेजित रक्तदान शिबिरात ५८ युवकांनी रक्तदान केले़ सध्या १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे़ लसीकरण केल्यानंतर दाेन महिने रक्तदान करता येत नाही़ त्यामुळे, लसीकरण करण्यापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले़
सिंदखेडराजा येथे आढावा बैठक संपन्न
सिंदखेडराजा : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी प्रशासनाने १० मे च्या रात्रीपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे़ कडक निर्बंधाच्या अंमलबजावणीसाठी सिंदखेडराजा येथे ९ मे राेजी आढावा बैठक घेण्यात आली़
घंटागाड्यांच्या बॅटऱ्या लंपास, गुन्हा दाखल
देऊळगाव राजा : नगरपरिषदेच्या आवारात उभ्या असलेल्या घंटा गाड्याच्या सहा बॅटऱ्या अज्ञात चाेरट्यांनी लंपास केल्या़ या प्रकरणी देऊळगाव राजा पाेलिसात तक्रार दिली आहे़ पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़