सिंदखेडराजा तालुक्यात धनगर समाज हा बहुसंख्येने आहे, परंतु नेतृत्वाअभावी समाजाची परवड होत आहे. समाज बांधवांनी आरक्षणाच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी एकत्रित येण्याची हाक देण्यासाठी त्यांनी विदर्भ दौऱ्याचे आयोजन केले असता उपराेक्त विधान त्यांनी केले. यावेळी त्यांच्या सोबत विदर्भ व मराठवाडा धनगर समाजाचे युवा नेते प्रल्हाद सोरमारे, शिवदास बिडगर, धनगर समाज महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पातोंड, विदर्भ अध्यक्ष नंदू लवंगे , नगरपालिका सभापती राजेंद्र आढाव यासह भाजपचे पदाधिकारी तसेच धनगर समाजाचे अनेक नेते त्यांच्यासोबत होते. मेंढपाळ व्यवसाय करताना समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मेंढपाळ व्यवसाय करण्यासाठी १० लाख रुपये कर्जाची तरतूद करण्यात आली आहे. समाजासाठी आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे.त्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहे.धनगर समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी वेळोवेळी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही त्यांनी साखरखेर्डा येथे प्रल्हाद सोरमारे यांनी आयोजित केलेल्या समाज बांधवांच्या बैठकीत दिली.
आरक्षण ही अस्तित्वाची लढाई- गोपीचंद पडळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 8:31 AM