रक्तदान शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:35 AM2021-09-19T04:35:40+5:302021-09-19T04:35:40+5:30
यावेळी डॉ. चव्हाण, डॉ. मोरे उपस्थित होते. नृसिंह प्रतिष्ठान या संघटनेतर्फे गणेशोत्सवानिमित्त ज्ञानमंदिरात रक्तदान शिबिर पार पडले. औरंगाबाद येथील ...
यावेळी डॉ. चव्हाण, डॉ. मोरे उपस्थित होते. नृसिंह प्रतिष्ठान या संघटनेतर्फे गणेशोत्सवानिमित्त ज्ञानमंदिरात रक्तदान शिबिर पार पडले. औरंगाबाद येथील दत्ताजी भाले रक्तपेढीच्या चमूने रक्ताचे संकलन केले. या शिबिरात मेहकर शहरातील ७० नागरिकांनी रक्तदान केले. उद्घाटनप्रसंगी ॲड. पितळे महाराज, डॉ. चव्हाण, डॉ. मोरे यांचा नृसिंह प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिबिराच्या यशस्वितेसाठी नृसिंह प्रतिष्ठानचे विनीत कुळकर्णी, हिंमत आसोले, समीर कुळकर्णी, ऋषिकेश जोशी, ऋषी सराटे, वैभव लाडसावंगीकर, अथर्व जीवने, नयन देशमाने, वैभव दायजे यांनी परिश्रम घेतले.
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यास मदत
नृसिंह प्रतिष्ठानच्या तरुण कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, पूरग्रस्तांना मदत, पर्यावरण जागृती यासोबतच रक्तदान शिबिर घेणे हे कौतुकास्पद आहे. या शिबिरामुळे कोरोनाच्या आपत्तीमुळे निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यात मदत होईल, अशी भावना ॲड. पितळे महाराज यांनी व्यक्त केली.