शॉर्ट मॅरेथॉन रॅलीला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:38 AM2021-08-24T04:38:50+5:302021-08-24T04:38:50+5:30

उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे व जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या वतीने रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी ...

Response to the Short Marathon Rally | शॉर्ट मॅरेथॉन रॅलीला प्रतिसाद

शॉर्ट मॅरेथॉन रॅलीला प्रतिसाद

Next

उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे व जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या वतीने रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी नेहरू युवा केंद्राचे समन्वयक अजयसिंग राजपूत, प्रकाश क्षेत्रे, रवींद्र गणेशे, राजेश डिडोळकर, विजय वानखेडे, प्रा.नंदू गायकवाड, हिंगे, एम.एम.राजपूत, सुभाष गिऱ्हे, नितीन भिसे, डॉ. राजपूत, नेवरे, राहुल औशालकर, नीलेश शिंदे, भरत ओलेकर, डिगांबर पाटील, दिनेश मानमोडे, धनंजय चाफेकर, समाधान टेकाळे, प्रवीण चिम आदी उपस्थित होते. याप्रसंगी पोलंड येथे झालेल्या जागतिक युवा आर्चरी स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक चंद्रकांत इलग, सुवर्ण पदक विजेता मिहीर अपार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जाधव यांनी प्रास्ताविक केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व उपक्रमाच्या स्वरुपामध्ये १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत ७५ आठवड्यात ७५ कार्यक्रमांचे आयोजन करणे, त्यानंतर २०२३ पर्यंत सर्व राज्यात त्यांच्या स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. प्रत्येक आठवड्यात एक कार्यक्रम राबविणे याबाबत जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शॉर्ट मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली. यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजक अनिल इंगळे, रवींद्र धारपवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक महेश खर्डेकर, विजय बोदडे, मनिषा ढोके, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे, भीमराव पवार, गणेश डोंगरदिवे, दीपक जाधव यांनी परिश्रम घेतले.

खेळाडूंचा होता सहभाग

या रॅलीमध्ये जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र कबड्डी, खो खो, मैदानी, द्रोणाचार्य आर्चरी ॲकॅडमीचे खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोबतच विविध संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी नागरिक सहभागी होते. संचालन राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी व आभार क्रीडा अधिकारी रवींद्र धारपवार यांनी मानले. या कार्यक्रमात पोलीस प्रशासन व जिल्हा सामान्य रुग्णालय यांचे वतीने रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करुन देण्यात आली होती.

Web Title: Response to the Short Marathon Rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.