जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकांवर निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:42 AM2021-09-16T04:42:36+5:302021-09-16T04:42:36+5:30
संगम तलाव येथे विसर्जन.. बुलडाणा शहरात शहर पोलीस स्टेशन १२ मंडळांना परवानगी दिली आहे. घरगुती व सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी ...
संगम तलाव येथे विसर्जन..
बुलडाणा शहरात शहर पोलीस स्टेशन १२ मंडळांना परवानगी दिली आहे. घरगुती व सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी संगम तलाव येथे विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी नगर परिषद कर्मचारी वार्डा-वार्डातून आणलेल्या मूर्तींचे विसर्जन करणार आहे.
पोलीस यंत्रणेवरील ताण हलका..
गणपती काळात सर्वाधिक ताण येतो तो पोलीस यंत्रणेवर. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व धार्मिक सलोखा कायम राखण्याची कसोटी या काळात लागते. भिन्न धर्मीयांचे सणदेखील या काळात येत असल्याने सर्वत्र बंदोबस्त तैनात असतो. यंदा मात्र पहिल्यांदाच पोलीस यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.
जिल्ह्यातील कुठल्याही गणपती मंडळांना विसर्जन मिरवणुकीची परवानगी देण्यात आलेली नाही़ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर कारवाई करण्यात येणार आहे़
रमेश बरकते, उपविभागीय पाेलीस अधिकारी, बुलडाणा.