नऊ लाख हेक्टर क्षेत्राला सूक्ष्म सिंचनची संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 02:47 PM2019-08-10T14:47:40+5:302019-08-10T14:47:49+5:30
सुमारे नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन संचांची उभारणी केल्याने ११ लाख शेतकºयांना मदत झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सूक्ष्म सिंचन योजनेची प्रक्रिया आॅनलाइन झाली असून, या योजनेमुळे लाखो हेक्टरवरील क्षेत्राला संजीवनी मिळाली आहे. राज्यात गेल्या पाच वर्षात सूक्ष्म सिंचन योजना प्रभावी आणि पारदर्शकपणे राबविल्याने सुमारे ११ लाख शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आहे. या योजनेमुळे सुमारे नऊ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे.
सूक्ष्म सिंचन योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि त्यांचा सहभाग त्यात वाढावा, यासाठी गेल्या काही वर्षात विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यामध्ये शेतकºयांनी या योजनेसाठी अर्ज करताना सोबत जोडण्यात येणाºया कागदपत्रांची संख्या २४ वरुन नऊ वर करण्यात आली. यामुळे प्रशासकीय गतीमानता येतानाच अर्ज मान्यतेचे प्रमाण वाढले आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकºयांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या योजनेच्या प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाहीबाबत लाभार्थी शेतकºयाच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे माहिती कळविली जाते. या योजनेच्या पूर्व संमतीचा ३० दिवसांचा कालावधी संपल्यानंतर देखील नव्याने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. २०१४ पासून सुमारे नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन संचांची उभारणी केल्याने ११ लाख शेतकºयांना मदत झाली आहे.
ई-ठिबकचा आधार
सूक्ष्म सिंचन या योजनेकरीता अर्ज स्वीकृतीसाठी ‘ई-ठिबक’ ही आॅनलाइन प्रणाली तयार करण्यात आली आहे. योजनेसाठी आॅनलाईन नोंदणीची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे ‘नोंदणी ते अनुदान’ वितरणाची संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे होत असल्याने ई -ठिबकचा शेतकºयांना आधार मिळाला आहे.
नोंदणी प्रक्रिया सुरू
४सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याकरीता २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी लाभार्थी नोंदणी व अनुदानासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. यामध्ये ज्या शेतकºयांनी २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षामध्ये नोंदणी केली आहे, त्यांना आता नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, अशा सुचना कृषी विभागाच्या ई-ठिबक प्रणालीवरून देण्यात आल्या आहेत.