अमडापूर : अमडापूर व परिसरात गेल्या ३ दिवसापासून जोरदार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले व नदीनाल्यांना पूर येवून गावातील पाण्याच्या विहिरीची पातळीत भर पडली आहे. यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्याने शेतकर्यांनी शेतात पेरण्या करून पावसाची प्रतिक्षा सुरू केली होती. परंतु अखेर पावसाने उशिरा का होईना जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी आनंदमयी होवून पिकांना जीवदान मिळून पिकाची परिस्थिती सुधारली आहे. या तीन दिवसाच्या पावसामुळे नदीनाल्यांना पूर येवून धरणामध्ये पाण्याची पातळी वाढ आहे. तर गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीची पातळी वाढली आहे.अमडापूर गावाला मुख्यरस्ता चिखली ते खामगाव हायवे रोडला लागून फरशी रस्ता असून या फरशीमधून मननदी वाहते व नदीला पुर आल्यास गावकर्यांना या पराण्यामधून जाता येत नाही. त्यामुळे या फरशीवर पुल बांधून दिल्यास गावकर्यांची एक मोठी समस्या दूर होवू शकते. तसेच या नदीच्या पुरातून गावामध्ये जात असताना वाहन व नागरीकांना पोलीस स्टेशन, तलाठी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा यामध्ये मुलांना तसेच अती महत्वाच्या सेवेसाठी मोठी कसरत करावी लागते. याकडे शासनाने लक्ष देवून फरशी याठिकाणी पुल बांधून द्यावा, अशी मागणी गावकर्यांकडून होत आहे.वैरागडपर्यंत रोडचे खड्डे बुजविल्या गेलेले आहे. परंतु वैरागड ते अमडापूर, अमडापूर ते दहीगावपर्यंंत रोडवर मोठमोठे खड्डे पडले आहे. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून रस्त्यावरील खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहे. त्यामुळे या रोडवर पडलेले खड्डे त्वरीत बुजवावे, अशी मागणी गावकर्यांकडून होत आहे.
अमडापूर परिसरात नदीनाल्यांना पूर
By admin | Published: September 02, 2014 10:54 PM