सद्यस्थितीत चिखली शहरात बीडीसीसी बँक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व श्री शिवाजी उद्यान ते स्टेट बँकेपर्यंत रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. महात्मा बसवेश्वर चौक ते बाबुलॉज चौकपर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था पाहता नगराध्यक्षा बोंद्रे यांनी विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास मान्यता मिळून ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र, कोरोनामुळे हे काम अडकून पडले होते. मात्र, आता या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली असल्याने या रस्त्याची समस्या सुटणार असल्याचा विश्वास नगराध्यक्षा बोंद्रे यांनी व्यक्त केला आहे. या रस्ताकामाची पाहणी नगराध्यक्षा बोंद्रे यांनी केली. यावेळी कुणाल बोंद्रे, न. प. सभापती गोपाल देव्हडे, सुरेशअप्पा बोंद्रे, शैलेश बाहेती, रवी देशमुख, राजेश लढ्ढा, कुडके उपस्थित होते. नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांनी रस्ताकामास निधी मंजूर करून आणल्याबद्दल पती कुणाल बोंद्रे यांना या कामाचे श्रेय दिले असून यामध्ये श्रेयवाद न घेता या कामास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. कामासाठी आ. संजय कुटे यांच्या विशेष प्रयत्नाने आ. अॅड. आकाश फुंडकर, माजी आमदार चैनसुख संचेती, धृपतराव सावळे यांच्या सहकार्याने भाजपा पक्षश्रेष्ठी, आ. श्वेता महाले यांचे योगदान लाभल्याचेही नगराध्यक्षा बोंद्रे यांनी स्पष्ट केले. चिखलीकरांना दिलेला शब्द पाळत असल्याचे मोठे समाधान लाभले असल्याचे सांगितले. नगरसेविका ममता बाहेती, गोपाल देव्हडे, मुख्याधिकारी वायकोस, न.प.अभियंता व सहकारी नगरसेवकांच्या सहकार्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
शहरविकासासाठी प्रयत्नशील : बोंद्रे
ग्रामदैवत श्री रेणुकादेवी वहन मार्ग, खैरूल्लाशाह बाबा दर्गाला जोडणारा या मुख्य रस्ताकामास सुरुवात झाली असून यात्रेपूर्वी हा रस्ता पूर्ण करण्यावर आपला भर आहे. शहरातील रस्त्यांसाठी प्रारंभीपासून प्रयत्न केला. या कामासाठी कुणाल बोंद्रे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे निधी मंजूर झाला आहे. चिखलीकरांनी दिलेली जबाबदारी पूर्णत्वास नेत असल्याचे मोठे समाधान लाभत असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांनी दिली. पेट्रोलपंपापासून डीपी रोड, जुना मेहकर रोड व इतर कामे प्रस्तावित असल्याची माहितीही त्यांनी दिली.