लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : ज्यांनी आभाळाला भोके पाडली तेच आता आभाळ फाटल्याची बोंब ठोकत आहे त, असा टोला मारत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधकांचा समाचार घेत बुलडाणा जिल्ह्यातील एक लाख १६ हजार ८४५ शेतकर्यांच्या खात्यात ६६५ कोटी रुपये जमा झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदुरा येथे स्पष्ट केले. दरम्यान, जिल्ह्याचा सिंचन व रस्ते अनुशेष दूर करण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचा एकाच दिवशी जिल्ह्यात प्रारंभ होत आहे, हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.नांदुरा येथील कोठारी विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी जिगावसह आठ लघू प्रकल्पाच्या कामांना प्रारंभ आणि चार हजार १११ कोटी रुपयांच्या रस्ते विकासाच्या कामास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिमोटची कळ दाबून प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोल त होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन तथा जलसंधारण मंत्री नितीन गडकरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खा. प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आ. चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमुलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, आ. आकाश फुंडकर, जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे यांच्यासह जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव चहल, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब ठेंग, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, झेडपी सीईओ ष्णमुखराज एस. उपस्थित होते.राज्यातील अवर्षण प्रवण १४ जिल्ह्यात तथा शेतकरी आत्महत्या होत असलेल्या पट्टय़ात सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी बळीराजा जलसंजीवनी योजना राबविण्यात येत आहे. पाणी, वीज जर शेतकर्याला मिळाली तर तो आर्थिक संपन्न होईल. त्यासाठी केंद्राच्या सहकार्याने २0 कोटी रुपयांची या योजनेसाठी तरतूद केली आहे. पूर्वीच्या सत्ताधार्यांच्या काळात हे प्रकल्प संथ गतीने होत होते तर यातील काही अडगळीत पडले होते. त्याला गती देण्यासाठी या योजनेतंर्गत काम हाती घेण्यात आले. यासाठी पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटून निधी खेचून आणला. १0८ प्रकल्पामुळे सिंचनाच्या सोयी शेतकर्यांपर्यंत पोहोचू शकणार आहे. यासाठी प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्काळ मान्यता दिली. जी कामे अर्धवट सोडली आहेत, ती कामे हातात घेऊन पूर्णत्वास नेण्यासाठी येत्या दोन वर्षांत प्रयत्न केले जातील. भूसंपादनाचा वेग वाढावा, यासाठी थेट खरेदीद्वारे शेतकर्यांच्या जमिनी जादा मोबदला देऊन खरेदी केल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी १५ वर्षांत पूर्वीच्या सत्ताधार्यांनी जे केले नाही, ते तीन वर्षांत आम्ही केल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसने विदर्भाला दिले तेवढे जिल्हय़ालाशेतकरी कर्जमाफीत काँग्रेसने विदर्भाला दिले तेवढे एकट्या बुलडाणा जिल्ह्याला मु ख्यमंत्र्यांनी दिले आहे, असे मत कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यावेळी व्यक्त केले. २२ हजार कोटी रुपये राज्यातील शेतकर्यांच्या खात्यात जमा झाल्याचे ते म्हणाले. मु ख्यमंत्र्यांमुळे सिंचन वाढले, जलयुक्तची कामे झाली आणि आता मागेल त्याला वीज आणि सौर ऊर्जेवर चालणारे वीज रोहित्र राहतील, असे ते म्हणाले.
मुंबई-शेगाव सी प्लेन सेवेचे स्वप्न - गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-शेगाव सी-प्लेन सेवा सुरू करण्याचे स्वप्न असून, शेगावातील आनंद सागरमध्ये हे प्लेन उतरावे, अशी इच्छा व्यक्त केली. मुंबईतील माणूस एका दिवसात शेगाव, शिर्डी व परत मुंबईत विमानाद्वारे जाईल, अशी योजना आकारास आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. दरम्यान, २0१५ मध्ये केलेल्या कामाच्या शुभारंभानंतर आता ही कामे पूर्णत्वाच्या दिशेने जात असल्याचा मनस्वी आनंद होत आहे. नांदुरा, शेगाव, संग्रामपूर, खामगाव तालुक्यातील रस्ते, पुलाचे काम सुरू झाले आहे. खामगाव, नांदुरा, जळगाव आदी शहरातील रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तीन पिढय़ा रस्त्यात खड्डे पडणार नाही, असे १00 टक्के गुणवत्ता असलेले रस्ते आम्ही देऊ, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. आता कॅनॉलऐवजी पाइपलाइने पाणी देण्यासोबतच ठिबक सिंचनाला प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. जिगाव प्रकल्पाचा पांडुरंग फुंडकर, चैनसुख संचेती सातत्याने जप करीत होते. त्यादृष्टीने केंद्राने हे मोठे पाऊल टाकले असून, हा संकल्प तडीस नेला असल्याचेही ते म्हणाले.
पालखी मार्गावर वारकर्यांसाठी लेनखामगाव-शेगाव पालखी मार्गावर वारकर्यांसाठी चार मीटरची स्वतंत्र लेन करण्यात येणार असून, या लेनवर टाइल्स, पेव्हर ब्लॉक न लावता त्यावर हिरवळ ठेवण्याचा आपला प्रयत्न आहे. जेणेकरून वारकर्यांच्या पायाला उन्हाचे चटके बसणार नाही, असे गडकरींनी सांगि तले. खामगाव शहरातून जाणार्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कामही मंजूर केले, तेही मार्गी लागल्याचे ते म्हणाले.