गेल्या अनेक वर्षांपासून कमेला परिसरातील रहिवाशांना तीन इंची पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या लोकसंख्या पूर्वीच्या तुलनेत जास्त झाली आहे. सोबतच पूवीर्पेक्षा जास्त नळ जोडण्यांमुळे तीन इंच पाईपलाईनमधून प्रत्येक घराच्या नळाचे पाणी येत नसल्याची ओरड होत होती. याबाबत परिसरातील नगरसेवकांकडे अनेक वेळा तोंडी तक्रारी करूनही समस्या तशीच होती. या समस्येला कंटाळून स्थानिक नागरिकांनी आरपीआय तालुका अध्यक्ष फिरोज खान नूर खान यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद प्रशासनाला ९ ऑगस्टला निवेदन दिले आणि लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करू न परिसरात सहा इंची पाईपलाईन बसविण्याची मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. न. प. प्रशासनाने आरपीआयच्या निवेदनाची दखल घेतली नाही़ त्यामुळे आरपीआयच्या वतीने १५ सप्टेंबरपासून आरपीआयचे तालुकाध्यक्ष फिरोज खान नूर खान यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू करण्यात आले आहे.
विविध मागण्यांसाठी आरपीआयचे उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 4:42 AM