लोणार पर्यटन विकासाकरिता ९३ कोटी रुपये मंजूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:49 AM2017-11-25T00:49:29+5:302017-11-25T00:54:17+5:30
विदर्भवासीयांसाठी खूशखबर आहे. राज्य शासनाने लोणार पर्यटन विकास प्रकल्पाकरिता ९३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भवासीयांसाठी खूशखबर आहे. राज्य शासनाने लोणार पर्यटन विकास प्रकल्पाकरिता ९३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे.
प्रतिज्ञापत्रातील अन्य माहितीनुसार, लोणार सरोवरातील पिसाळ बाभुळ नष्ट करण्यासाठी आर्थिक तरतूद उपलब्ध झाली आहे. परंतु, प्रधान मुख्य वन संवर्धकांची परवानगी नसल्यामुळे काम रखडले आहे. लोणार सरोवरात सांड पाणी जाऊ नये यासाठी उभारण्यात आलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नगर परिषदेला हस्तांतरित करण्यात आला आहे.
न्यायालयाने शुक्रवारी हे प्रतिज्ञापत्र लक्षात घेता प्रकरणावरील सुनावणी तीन आठवडे तहकूब केली. याप्रकरणात अँड. आनंद परचुरे न्यायालय मित्र आहे त.
बोअरवेलचा झर्यांना फटका
लोणार गावात आवश्यकतेपेक्षा जास्त बोअरवेल्स असून त्यामुळे सरोवरातील झरे आटत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात संशोधन करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास संस्थेला पत्र पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. तसेच, येत्या १५ डिसेंबर रोजी होणार्या बैठकीमध्ये संस्थेच्या प्रतिनिधींना बोलावण्यास सांगितले आहे.