हरियाणातून आलेले ५० लाख रुपये जप्त, खामगाव पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 01:08 PM2018-06-27T13:08:22+5:302018-06-27T13:08:41+5:30
हरियाणा येथून मुंबई येथे जात असलेले सुमारे ५० लाख रुपयांच्या नव्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई २७ जून रोजी सकाळी ११.१५ वाजता खामगाव - नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर चिखली खुर्द येथे करण्यात आली.
खामगाव : हरियाणा येथून मुंबई येथे जात असलेले सुमारे ५० लाख रुपयांच्या नव्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई २७ जून रोजी सकाळी ११.१५ वाजता खामगाव - नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर चिखली खुर्द येथे करण्यात आली.
हरियाणातील एका गाडीमध्ये रोख रक्कम जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून अप्पर पोलिस अधिक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला. खामगावपासून काही अंतरावर हरियाणातील डी.एल. सी. ए.एफ. ४९४३ क्रमांकांच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये पोलिसांना ५० लाख रुपयांच्या नव्या नोटा आढळल्या.
या प्रकरणी पोलिसांनी अर्षद खान रहेमान खान, आसिफ खान हारून खान, अब्दुल्ला मजीद, इरफान खान जाणू खान सर्व रा. हरियाणा यांना ताब्यात घेतले आहे. याशिवाय त्यांच्याकडून १ देशी कट्टा सुद्धा ताब्यात घेतला आहे. पुढील कारवाई सुरु आहे. ही रक्कम मुंबई येथे जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.